अक्षय खन्नाला पाहून लोक म्हणाले, ‘ये क्या हो गया देखते-देखते’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाच्या ताज्या फोटोंची चर्चा या दिवसात खूपच होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अक्षयची छायाचित्रे समोर आल्यानंतर चाहत्यांनी अभिनेत्याच्या तब्येतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सोशल मीडियावरील अक्षय खन्नाचे फोटो पाहून तो आजारी असल्यासारखा वाटत आहे. त्याची तब्बेत खालावलेली आणि डोक्यावरचे केस पूर्णतः गेलेले फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. क्या से क्या हो गया ? हेअर टर्न्सप्लान्ट का करत नाही ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न नेटकऱ्यांकडून अक्षयला सोशल मीडियावर विचारले जात आहेत.

अक्षय खन्ना यांच्या फोटोवर बर्‍याच जणांनी त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. तसेच अनेकांनी असे प्रश्न उपस्थित केले की आजच्या काळात अक्षय खन्ना स्वत: ला फिट का ठेवत नाहीत ?

लवकरच अक्षय खन्ना सेक्शन ३७५ नावाच्या चित्रपटात एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे ज्यात अभिनेत्री रिचा चड्डा सुद्धा काम करणार आहे. अजय बहल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like