Alcohol Substitute | सिगरेट-दारू सोडायची असेल तर प्या ‘ही’ 5 देशी ड्रिंक, पिताच टेन्शन आणि थकवा होईल गायब

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Alcohol Substitute | तणाव आणि चिंता (Stress And Anxiety) ही आजकाल सर्वात मोठी समस्या बनली आहे. कामाचा वाढता ताण, घरकाम, ट्रॅफिक, दहा-दहा तास चालणार्‍या मोठ्या शिफ्ट्स, बॉसकडून होणारी खरडपट्टी, झपाट्याने वाढणारे प्रदूषण, बस-ट्रेनची गर्दी, यामुळे मन थकून जाते. साहजिकच अशावेळी कोणतीही व्यक्ती अस्वस्थ होऊ शकते. टेन्शन फ्री होण्यासाठी सायंकाळ होताच अनेक जण दारूच्या बाटल्या उघडतात (Alcohol Substitute).

 

दारू-सिगारेट (Alcohol-Cigarettes) किंवा इतर नशा तुमच्या मनातील अस्वस्थता थोडी कमी करतात यात शंका नाही, पण तुम्हीच विचार करा की रोजचा ताण आणि चिंता यातून मुक्त होण्याचा हा योग्य मार्ग आहे का? अंमली पदार्थ (Drugs) घेतल्याने तुमची अस्वस्थता थोड्या काळासाठी कमी होऊ शकते परंतु त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळासाठी तुमचे आरोग्य खराब करू शकतात (Drug Side Effects On Health).

 

पोषणतज्ञ आणि आहारतज्ञ शिखा अग्रवाल शर्मा तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगतात ज्या आरोग्यदायी आहेत आणि अल्कोहोलला पर्यायी होऊ शकतात. या गोष्टींचे सेवन केल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि मनातील तणाव लवकर दूर होतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ते तुमच्या घरी बनवू शकता (Alcohol Substitute).

 

1. होममेड एनर्जी ड्रिंक (Homemade Energy Drink)
घरगुती एनर्जी ड्रिंक बनवण्यासाठी एक ग्लास थंड पाणी घ्या आणि त्यात अर्धा चमचा कॉफी पावडर
आणि अर्धा चमचा दूध मिसळा. ते प्यायल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.

2. बदाम आणि अक्रोड मिश्रण (Almond And Walnut Mixture)
बदाम आणि अक्रोड बारीक करून पावडर बनवा. थोडी छोटी वेलची बारीक करून मिक्स करा.
त्यात थोडी गूळ पावडरही मिसळू शकता. ऑफिसमधून येण्यापूर्वी किंवा झोपण्यापूर्वी हे मिश्रण घ्या.
त्यामुळे चांगली झोप लागते.

 

3. सर्पगंधा (Indian Snakeroot)
ही एक औषधी वनस्पती आहे जी झोपेला चालना देण्यासाठी, चिंता दूर करण्यासाठी आणि तणावाचा सामना करण्यासाठी उपयुक्त आहे.
मनाची गती कमी करण्यासही ती उपयुक्त आहे. तुम्ही ती पाणी किंवा दुधासोबत घेऊ शकता.
ती घेतल्यावर एक गोड नशा मनात भरू लागते, त्यामुळे गाडी चालवणे टाळा.

 

4. एनर्जिक डिटॉक्स पाणी (Energic Detox Water)
हे बनवण्यासाठी अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा छोटी वेलची पावडर, अर्धा चमचा भाजलेले जिरे आणि अर्धे लिंबू एका ग्लास पाण्यात मिसळा. तुम्ही ते दिवसभर आरामात पिऊ शकता. यामुळे मन रिलॅक्स राहते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Alcohol Substitute | according to nutritionists and dieticians 5 homemade drinks are best substitute of alcohol for stress and anxiety

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar on Raj Thackeray | ‘कुणी अल्टिमेटम देऊन जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर…’; अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा !

 

MP Navneet Rana and MLA Ravi Rana | राणा दाम्पत्याच्या अडचणीत प्रचंड वाढ, कोठडीतील मुक्काम वाढला

 

Imtiyaz Jaleel on Sharad Pawar | ‘शिवसेना कमकुवत व्हावी, मनसे वाढावी, ही तर शरद पवारांची इच्छा’; इम्तियाज जलील यांचा पवारांवर निशाणा !