मद्यपी चालकांना अवघ्या २ तासांत बडतर्फ करणार : परिवहन मंत्री दिवाकर रावते

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात शिवाजीनगर बसस्थानकात घडलेल्या घटनेची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गंभीर दखल घेतली आहे. दारू पिऊन बस चालवणाऱ्या चालकाला अवघ्या दोन तासांत बडतर्फ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला आहे. शिवाजी नगर येथे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकाला बडतर्फ करण्यात आले आहे.

शिवाजीनगर बसस्थानकातील घटनेप्रमाणे कृत्य करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यास आपल्या नोकरीला कायमचे मुकावे लागेल, अशा कडक नियमावली प्रशासनाने राबवावी, असे आदेश श्री. रावते यांनी प्रशासनाला दिले आहेत. जेणेकरून भविष्यात मद्यपान करून गैरवर्तन करणाऱ्यांना कायमचा आळा बसेल.

काल (२५ जुलै) पुण्यातील शिवाजी नगर बसस्थानकात चालक अमोल चोले याने दारू पिऊन शिवशाही बस चालवली. ही बस बस्थानकाबाहेरील रिक्षाला धडकल्यामुळे पुढील होणारा अपघात टळला. शिवशाही बसमधील वाहकाच्या आणि प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मद्यपी चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या महामंडळाकडून प्रवाशांच्या जीवाला धोक्यात घालणे परवडणारे नाही.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like