Lockdown 3.0 : पुण्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ‘ही’ सर्व दुकाने देखील उघडणार, जाणून घ्या वेळापत्रक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायसरनं सर्वत्रच थैमान घातलं आहे. काही ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे तर काही ठिकाणी कोरोनावर मात करण्यात आली आहे. पुणे शहरातील तब्बल 69 परिसर हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहे. सर्व प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्राबाहेर खालील दुकाने उघडण्यास मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी परवानगी दिली आहे. ही खालील प्रमाणे.

सोमवार – ईस्त्री व लॉन्ड्री दुकाने, स्टेशनरी दुकाने, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणार्‍या कच्चा मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय.

मंगळवार – वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामुग्री, तयार फर्निचरची विक्री.

बुधवार – ईस्त्री व लॉन्ड्री दुकाने, फूट वेअर, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणार्‍या कच्चा मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय.

गुरूवार – वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामुग्री, स्टेशनरी दुकान, तयार फर्निचर विक्री.

शुक्रवार – इस्त्री व लॉन्ड्री दुकान, फूट वेअर, बांधकाम साहित्य विक्री, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणार्‍या कच्चा मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय.

शनिवार – वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामुग्री, ईस्त्री व लॉन्ड्री दुकान, बांधकाम साहित्य विक्री, तयार फर्निचर विक्री.

रविवार – वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामुग्री, स्टेशनरी दुकान, फूट वेअर, बांधकाम साहित्य विक्री.

दुकान उघडण्याची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 राहणार आहे.