अलाहाबाद हायकोर्टाने सुनावला महत्वाचा निर्णय, म्हटले – ‘केवळ विवाहासाठी धर्म परिवर्तन वैध नाही’

प्रयागराज : वृत्तसंस्था – धर्म परिवर्तनबाबत अलाहाबाद हायकोर्टाने एक खुपच महत्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले की, केवळ विवाहासाठी धर्म परिवर्तन वैध नाही. कोर्टाने सुनावणीनंतर विरूद्ध धर्माच्या जोडप्याची याचिका फटाळली. कोर्टाने याचिकाकर्त्यांना संबंधित मॅजिस्ट्रेटच्या समक्ष हजर होऊन आपला जबाब नोंदवण्याची सूट दिली आहे. मुजफ्फरनगर जिल्ह्यातील विवाहित जोडप्याने कुटुंबियांना त्यांच्या शांततेच्या वैवाहिक जीवनात हस्तक्षेप करण्यावर प्रतिबंध लावण्याची मागणी केली होती. परंतु, कोर्टाने याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार देत ती फेटाळली.

विवाह करण्यासाठी धर्म परिवर्तन केले
हा आदेश जस्टिस एम.सी त्रिपाठी यांच्या एक सदस्यीय पीठाने प्रियांशी उर्फ समरीन आणि इतरांकडून दाखल याचिकेवर दिला आहे. कोर्टाने आपल्या निणर्यात म्हटले की, एक याचिकाकर्ता मुस्लिम आहे तर दुसरा हिंदू आहे. मुलीने 29 जून 2020 ला हिंदू धर्म स्वीकरला आणि एक महिन्यानंतर 31 जुलैला तिने विवाह केला. कोर्टाने या आधारावर म्हटले की, रेकॉर्डवरून स्पष्ट होते की, विवाह करण्यासाठी धर्मपरिवर्तन केले आहे.

विश्वासाशिवाय धर्म बदलने स्वीकारार्ह नाही
कोर्टाने नूरजहां बेगम केसच्या निर्णयाचा हवाला दिला, ज्यामध्ये कोर्टाने म्हटले आहे की, विवाहासाठी धर्म बदलणे स्वीकारार्ह नाही. या केसमध्ये हिंदू मुलीने धर्म बदलून मुस्लिम मुलाशी विवाह केला होता. कोर्टासमोर प्रश्न हा होता की, हिंदू मुलगी धर्म बदलून मुस्लिम मुलाशी विवाह करू शकते का आणि हा विवाह वैध असेल का. कोर्टाने कुरानच्या हदीसांचा हवाला देत म्हटले होते की, इस्लामबाबत जाणून न घेता आणि विश्वासाशिवाय धर्म बदलणे स्वीकारार्ह नाही. हे इस्लामच्या विरूद्ध आहे. याच निर्णयाच्या हवाल्याने कोर्टाने मुस्लिमहून हिंदू बणून विवाह करणारी प्रियांशी उर्फ समरीनला दिलासा देण्यास नकार दिला आहे.