न्यायाधीशांच्या नियुक्‍तीत ‘परिवारवाद’ आणि ‘वंशवाद’ ; ‘HC’ च्या न्यायाधींशांचे PM मोदींना पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंगनाथ पांडेय यांनी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या दरम्यान वंशवाद आणि जातीवाद होत असल्याचा आरोप केला आहे. यासंबंधित तक्रार करणारे पत्र त्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले आहे.

न्यायाधीश पांडेय यांनी या पत्रात लिहले आहे की, लोकशाहीच्या ३ स्तंभामधील महत्वपुर्ण असलेल्या न्यायमंडळाला वंशवादाने आणि जातियवादाने पोखरूण काढले आहे.

मापदंड परिवारवाद –

त्यांनी पुढे असे ही लिहले आहे की, येथे न्यायाधीश झालेल्या कुटूंबातीलच सदस्य पुढील न्यायाधीश होणार हे ठरलेले असते. न्यायाधीश पांडेय यांनी सांगितले की, विविध स्पर्धा परिक्षेत अनेक मापदंड आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयसाठी असे कोणतेही परिक्षा नाही. येथे एकच मापदंड आहे परिवारवाद आणि नातलग असणे.

याच पत्रातून न्यायाधीश पांडेय यांनी पंतप्रधान मोदींना लोकसभा निवडणूकीत बहुमत मिळाल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या आहेत. त्यांनी या पत्रात असेही सांगितले आहे की, मोदींनी वंशवादाच्या राजकारणाला संपवण्याचे महत्वपुर्ण काम केले आहे. याआधी देखील यावरुन बराच वादंग झाला आहे, अनेक न्यायाधीशांनी या बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेकांनी पंतप्रधानांना यसंबंधित पत्र लिहले आहे.

न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्तीत परिवारवाद आणि वंशवाद हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे, कारण अनेक न्यायाधीशांच्याच मुलांना उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याच्या मान मिळत आला आहे.

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव