आदित्य ठाकरेंच्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’मध्ये नवी मागणी, ‘या’ ठिकाणी देखील ‘हॉटेल्सना’ रात्रभर ‘परवानगी’ द्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नाईट लाईफ या मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ड्रिम प्रोजेक्टला 26 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. मुंबईतील मॉल्स आणि कंपाऊंडमधील हॉटेल 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी काही हॉटेल व्यावसायिक मात्र या निर्णयाने नाखुश दिसत आहेत. यामागे त्यांचा म्हणणे आहे की मॉल्स मधील हॉटेल्स कितीही दर आकारतील आणि त्यांची मक्तेदारी होईल ते वेगळे. एवढंच नाही तर जे पर्यटक मॉलपर्यंत पोहोचणार नाहीत अशांसाठी रेल्वे स्टेशन बाहेरचे हॉटेल सुरु ठेवण्याची मागणी आहारने केली आहे.

मुंबईतील प्रमुख रेल्वे स्टेशन म्हणजेच सीएसएमटी,दादर, बांद्रा, कुर्ला या सारखा प्रमुख स्टेशनबाहेरील हॉटेल खुली ठेवावीत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना खाण्यासाठी कुठे भटकायला नको, कारण अनेक मेल एक्सप्रेस या रात्रभर मुंबईत येत असतात.

आहार ही हॉटेल व्यावसायिकांची संघटेना आहे याचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या या निर्णयाचे स्वागत करतो, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. येथे पर्यटनाला चालना देणारा निर्णय महत्वाचा आहे, परंतु सगळेच मॉल्समध्ये कसे जाणार, पर्यटक काही फक्त परदेशीच नसतो, त्यामुळे बांद्रा, दादर, कुर्ला परिसरातील हॉटेलना 24 तास खुले ठेवण्याची परवानगी द्यावी. आम्ही यासंबंधित पत्र लवकरच पर्यटन मंत्र्यांना देऊ परंतु यापूर्वी मंत्र्यांना आम्ही कल्पना दिली आहे. परवानग्या जरी मिळाल्या तरी जर धंदा झाला तरच हॉटेल मालक हॉटेल 24 तास खुलं ठेवतील.

काही हॉटेल मालकांच्या मते 24 तास हॉटेल सुरु ठेवण्यापेक्षा शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवस सकाळी 3 वाजेपर्यंत शेवटची ऑर्डर घेण्याची परवानगी द्यावी, ज्यामुळे आमच्यावर कर्मचाऱ्यांना द्यावा लागणाऱ्या पगाराचा, विजेच्या बिलाचा आधिक भार पडणार नाही आणि किचनला देखील थोडा अवधी मिळेल.

या मागण्या असल्या तरी निश्चित झाल्याप्रमाणे 26 जानेवारीच्या रात्रीपासून मॉल्स आणि मिल कंपाऊंडमध्ये हॉटेल 24 तास सुरु राहतील. मॉल्समधील इतर दुकानदारांनी देखील आपली दुकाने सुरु ठेवण्याची मुभा असली तरी त्यांच्याकडून मिळणार प्रतिसाद कसा आहे हे पाहावे लागेल. एकीकडे ऑनलाइन शॉपिंगमुळे दुकानदारांना फटका बसत असताना दुकानदार 24 तास दुकाने खुली ठेवतील याबाबत साशंकता आहे.

फेसबुक पेज लाईक करा –