Allu Arjun National Award | अल्लू अर्जुनच्या घराबाहेर चाहत्यांचा जल्लोष; पहिल्यांदाच तेलुगू अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार

पोलीसनामा ऑनलाइन – काल (दि.24) 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (69th National Film Awards) यादी दिल्लीमधून (Delhi) घोषित करण्यात आली. यानंतर चित्रपटसृष्टीशी निगडित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. प्रेक्षकांना देखील हा पुरस्कार कोणाला प्रदान होणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांना तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अल्लू अर्जुनला पुरस्कार जाहीर (Allu Arjun National Award) करण्यात आला. यावेळी पुरस्कारामध्ये बॉलीवुडला (Bollywood) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने जबरदस्त टक्कर दिलेली पाहायला मिळाली. यावेळी पहिल्यांदाच तेलुगु अभिनेत्याला (Telugu Actor) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने जबरदस्त सेलिब्रेशन केले. यावेळी अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun National Award) घराबाहेर देखील फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. या सेलिब्रेशनचे व्हिडिओ आता समोर येत आहेत.

अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा; द राइज’ (Pushpa; The Rise) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. दाक्षिणात्य या चित्रपटाने संपूर्ण देशाला वेड लावले होते. प्रत्येकाच्या ‘तोंडी झुकेंगा नहीं साला…’ हा डायलॉग ऐकायला मिळत होता. अल्लूच्या ‘पुष्पा’ या पात्राचे डायलॉग, स्वॅग आणि स्टाईल यामुळे प्रेक्षकांना हे पात्र आपलेसे वाटले. अभिनेता अल्लू अर्जुनने देखील या चित्रपटामध्ये प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटामध्ये अभिनेता अल्लू अर्जुनने अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोबत स्क्रीन शेअर केली होती. आता चित्रपटातील पुष्पा हे पात्र साकारलेल्या अल्लू अर्जुनने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. यामुळे अनेक ठिकाणी त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला. अल्लू अर्जुनच्या घराबाहेर देखील चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

अभिनेता अल्लू अर्जुनला ‘पुष्पा’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (Allu Arjun National Award) म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. सोशल मीडियावर देखील अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. अनेक चाहते अल्लूच्या घराबाहेर त्याला शुभेच्छा देणासाठी आले होते. त्याने आलेल्या सर्व चाहत्यांना अभिवादन करुन त्यांचे धन्यवाद मानले. चाहत्यांनी देखील फटाके फोडून आनंद व्यक्त केला. अल्लू अर्जुनच्या वडिलांनी देखील त्याला मिठी मारुन त्याचे कौतुक केले. यावेळी पुष्पा चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमारही (Director Sukumar) देखील अल्लू अर्जुनच्या घरी गेले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 400 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या ‘पुष्पा; द राइज’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘पुष्पा 2; द रूल’ (Pushpa 2: The Rule) देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Loan Processing Fees | ‘या’ बॅंकेने केली लोन प्रोसेसिंग फी माफ; कर्जदारांना होणार फायदा

Atal Pension Yojana | अटल पेंशन सरकारी योजना रिटायरमेंटनंतर देऊ शकते दरमहा हजारो रुपये