झारखंड : सर्वात कमी वयाची MLA, आई तडीपार – वडिल तुरूंगात तरीदेखील ‘जिंकली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंडमध्ये जनतेने भाजपला नाकारत महागठबंधनवर विश्वास दर्शवल्याचे कालच्या निकालावरुन स्पष्ट झाले. झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवत महागठबंधनने 47 जागांवर विजय मिळवला. तर भाजपला 25 जागांवर विजय मिळवता आला. आता झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महागठबंधनाला सरकार बनवणार आहे. या निवडणूकीत सर्वांची नजर होती ती बडकागाव मतदारसंघावर, कारण हे होते की येथे काँग्रेसच्या उमेदवार अम्बा प्रसाद  निवडणूक लढवत होत्या.

अम्बा प्रसाद यांनी निवडणूकीत विजय मिळवला आहे, 27 वर्षांच्या वयात त्यांनी आजसूचे उमेदवार रोशनलाल चौधरी यांना 30,140 मतांनी हरवून विजय मिळला. अम्बा यांनी बॅचलर्स ऑफ बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशन नंतर ह्यून रिसोर्सेजमध्ये एमबीए आणि लॉचे शिक्षण घेतले. 2014 मध्ये अम्बा दिल्लीमध्ये राहून यूपीएससीची तयारी करत होत्या, तेव्हा त्यांना कळाले की त्यांच्या वडीलांची तब्येत खराब आहे, त्यानंतर त्या बडकागावमध्ये परत आल्या परंतु दिल्लीला परत जाऊ शकल्या नाहीत.

लोकसभा निवडणूकीत 2019 मध्ये त्यांनी आपल्या आईबरोबर निर्मला देवी यांच्यासह त्यांच्या प्रतिनिधी म्हणून प्रचार केला होता. त्या तेव्हा चर्चेत आल्या जेव्हा माजी काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्याबरोबर इतर काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचारासाठी त्या मैदानात उतरल्या होत्या.
ज्या बडकागाव मतदारसंघातून अम्बा यांनी विजय मिळवला, तेथूनच्या त्यांच्या वडीलांनी योगेंद्र साव यांनी 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळला होता. ते मंत्री देखील झाले होते, त्यांच्यावर अनेक आरोप असल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले.

यानंतर पुढील निवडणूकीत म्हणजे 2014 मध्ये अम्बा यांच्या आई निर्मला देवी यांनी याच मतदार संंघातून विजय मिळावला. काँग्रेसच्या तिकीटावर त्या देखील विजयी झाल्या होत्या. म्हणजे मागील तिन्ही टर्म या मतदार संघावर याच कुंटूंबाचा कब्जा आहे. या मतदार संघात त्यांचे वडील योगेंद्र यांचा चांगला दबदबा आहे. ते तेथील बाहुबली मानले जातात. योगेंद्र साव यांच्यावर जवळपास 24 खटले दाखल आहेत. झारखंड न्यायालयाने त्यांना रामगढ स्पंज आयरन फॅक्ट्रीच्या एका प्रकरणात शिक्षा सुनावली होती आणि सर्वाच्च न्यायलायने या शिक्षेला कायम ठेवले.

असेही सांगितले जाते की अम्बा प्रसाद यांचे वडील योगेंद्र साव आणि आई निर्मला देवी 2016 मध्ये झालेल्या आंदोलनानंतर चर्चात आले. एनटीपीसीने खननसाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली होती, ज्याचा चांगला परतावा शेतकरी मागत होते.

या दरम्यान आंदोलन हिंसक झाले होते आणि पोलीस फायरिंगमध्ये हे चार लोक मारले गेले. झारखंडमध्ये हे प्रकरण बडकगाव गोळीकांडच्या नावाने ओळखतात. या प्रकरणी निर्मला देवी यांना अटक करण्यात आली होती. परंतु गावकऱ्यांनी पोलीस कस्टडीमधून त्यांना सोडवले. यानंतर सुनावणी सुरु झाली आणि निर्मला देवी यांना तडीपार करण्यात आले. जेणेकरुन खटल्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

 

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/