Ambadas Danve | काय हा ‘फडतूस’पणा? ‘तो’ फोटो शेअर करत अंबादास दानवेंचे टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) चर्चेचा विषय बनला आहे. अयोध्या दौऱ्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी शक्तीप्रदर्शन केलं. तर त्यांच्या दौऱ्यावरुन विरोधकांनी टीका केली. यामध्ये आता अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उडी घेतली आहे. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एक फोटो ट्वीट करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सवाल केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात खंडणी (Extortion), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), अमली पदार्थांची तस्करी (Drug Smuggling) अशा विविध गुन्ह्यांत आरोपी असलेला ठाण्यातील गुंडही दिसल्याचे समोर आली आहे. ट्विटरवरील शुभम जटाल (Shubham Jatal) नावाच्या तरुणाने ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धू उर्फ सिद्धेश अभंगे याचा एक फोटो ट्वीट केला आहे. ठाण्यातील गुंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकांबरोबर काय करत आहे? तोही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अयोध्या दौऱ्यावर गेला होता काय? असा सवाल शुभम जटाल नावाच्या तरुणाने विचारला आहे.

शुभम जटला याचे ट्विट रिट्विट करुन अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सवाल विचारला आहे. काय हा ‘फडतूस’ पणा? अगोदर गुजरातला वॉशिंग मशीन लावून गद्दार धुतले. आता पवित्र अशा अयोध्येत मशीन लावून खून खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगे तेथे धुवायला नेलेला वाटतं. ते ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून. आता हे तुम्हाला चालते का देवेंद्र फडणवस जी? असा सवाल दानवे यांनी विचारला आहे.

Web Title : Ambadas Danve | ambadas danve tweet on goon siddhesh abhange ayodhya visit with eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP Supriya Sule | अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

Chandrakant Patil At Policenama Pune Office | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘पोलीसनामा’च्या कार्यालयास सदिच्छा भेट, विविध विषयांवर चर्चा

CM Eknath Shinde | भविष्यात शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान

Maharashtra Politics News | ‘अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे…’, ईव्हीएमच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला