Ambadas Danve | दिल्लीच्या समोर पाय चाटायला शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवले नाही, अंबादास दानवेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेने बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाण चिन्हावर (Shivsena Dhanushyaban Symbol) दावा केला आहे. यानंतर हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission) गेले. शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटांनी (Thackeray Group) पक्षावर आणि चिन्हावर दावा केल्यानंतर आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवले आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत कोणी वर मान करुन बोलू नये, असा टोला शिवसेनेला लगावला होता. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी फडणवीसांवर जोरदार पलटवार केला आहे. अंबादास दानवे (Ambadas Danve) अकोला येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले की, फडणवीसांची मान ऑलरेडी खाली गेली आहे, शिवसेनेच्या ताकदीवर भारतीय जनता पार्टी (BJP) मोठी झाली. त्यांचे बोट धरून हे मोठे झाले आहेत. हे शिवसेना फोडण्यासाठी मागच्या तीन वर्षापासून लागलेले आहेत. कारण शिवसेनेने या महाराष्ट्राला ताठ मानेनं जगायला शिकवले आहे. दिल्लीच्या समोर पाय चाटायला शिवसेनाप्रमुखांनी (Shivsena Chief) आम्हाला शिकवले नाही, आणि शिवसेनेला ताठ मानेची भाषा करण्याची गरज नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटले.

 

भाजप आणि शिंदे गटाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) प्रत्युत्तर दिले जात आहे. याच दरम्यान अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला खोचक टोला लगावला आहे. अमृता फडणवीसांच्या या टीकेला अंबादास दानवे प्रत्युत्तर दिले. आमची चिंता आम्ही करु, त्यांनी काय-काय गमावलंय, पती मुख्यमंत्रीपदावरुन उपमुख्यमंत्रीपदावर आले आहेत, असा टोला दानवे यांनी अमृता फडणवीस यांना लगावला.

 

अब्दुल सत्तार ही एक विकृती

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या पीएला शिवीगाळ झाली,
यासंदर्भात विचारणा केली असता, अब्दुल सत्तार ही एक विकृती आहे,
ते कुठेही गेले तरी तसेच वागणार असा टोला दानवे यांनी सत्तारांना लगावला.
तसेच त्यांनी आता फक्त मुख्यमंत्र्यांच्या पीएला शिवीगाळ केली आहे.
पुढे आणखी कुणाकुणाला करतील हे दिसेलच, असंही दानवे म्हणाले.

 

 

Web Title :- Ambadas Danve | Devendra Fadnavis of Ambadas Demons counter attack, said…

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा