Ambadas Danve | अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र, म्हणाले – ‘शेतकरी ओल्या दुष्काळाने चिंतेत आणि इकडे…’

औरंगाबाद  : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात यापूर्वी झालेल्या पावसाने आणि आता परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे (Rain in Maharashtra) अतोनात नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विरोधी पक्षांनी ओल्या दुष्काळाची मागणी करूनही राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये देखील संतापाचे वातावरण आहे. अशा स्थितीत मनसेच्या मुंबईतील दीपोत्सवात (MNS Deepotsav) सहभागी झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अंबादास दानवे (Ambadas Danve) औरंगाबद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, सलग अडीच ते पावणे तीन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे हाती आलेले मका, बाजरी, सोयाबीन या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे मराठवाड्यातील सुमारे साडेचारशे शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, राज्यातही शेतकर्‍यांच्या आत्महत्या (Suicide) वाढत आहेत. शेतकर्‍यांना तत्काळ दिलासा देण्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्या.

 

ते पुढे म्हणाले की, मी काल पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात जाऊन आलो. मराठवाडा, विदर्भाचाही नुकताच दौरा केला. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत सुरू असलेल्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेले पीक पावसाने हिरावून नेले. पावसामुळे शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेले आहे. सततच्या पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, रब्बीची पेरणी कशी करावी, अशी चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका करताना दानवे म्हणाले, पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता, राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे.
असे असताना राज्याचे कृषिमंत्री राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे म्हणत आहेत.
विशेष म्हणजे कृषिमंत्री गुडघाभर पाण्यात उभे राहून नुकसानीची पाहणी करतानाचे व्हिडीओ आहेत.
ते सोडले, तर राज्यातील अन्य मंत्री असंवेदनशील असल्याचा आरोप दानवे यांनी केला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री उत्सव साजरा करण्यात मग्न आहेत.

 

Web Title :- Ambadas Danve | rains spoil the crop declare a wet drought demand of ambadas danve

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rohit Patil | कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीची मते फुटल्यावर रोहित पाटलांचा संजय पाटलांना प्रश्न

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे उद्यापासून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार

Aditya Thackeray | तुमच्या दोघांपैकी जे कोणी खरे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी माझ्या मागणीची दखल घ्या – आदित्य ठाकरे