Ambadas Danve | असल्या गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही, अंबादास दानवेंचा राज्य सरकारवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य सरकारवर (State Government) टीका करत विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर गुन्हे (FIR) दाखल केले जात आहेत पण असल्या गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही, असे अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले.

सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group)  नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. पण आम्ही तसल्या गुन्ह्यांना भीक घालत नाही. आम्ही विरोधी पक्ष आहोत. सरकारच्या चुकांवर बोट ठेवणे आमची जबाबदारी आहे. सरकारला यात गैर वाटत असेल आणि त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील, तर शिवसेना या गुन्ह्यांची चिंता करत नाही. असे गुन्हे आमच्यावर अनेकदा दाखल झाले आहेत. मुंबईत आझाद मैदानावर विना अनुदानित शाळांतील शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आणि शिक्षकांबाबतच्या धोरणाला सरकार तिलांजली देत आहे. 10 ऑक्टोबरपासून शिक्षक आंदोलन करत आहेत, पण त्यांच्याकडे कोणी बघत नाही, असे अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले.

तसेच पुराच्या पाण्यामुळे पाणीपुरवठा (Water Supply) करणारे पंपच बंद आहेत. मग आता आकाशातून पाणी टाकू का? असे विधान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले होते.
त्यांचा समाचार दानवेंनी यावेळी घेतला.
मंत्र्यांनी जनतेच्या मागणीकडे आणि भावनांकडे संवेदनशीलतेने बघितले पाहिजे.
मंत्र्यांचे अश्या पद्धतीने बोलणे जनतेच्या भावनेचा अपमान आहे, असे दानवेंनी सांगितले.

राज्यात शिधा वाटपाच्या पाकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi),
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
यांचे फोटो आहेत. या सणांत नेत्यांनी राजकारण करु नये, असे यावर दानवे म्हणाले.
एखादी मोठी योजना राबवून दिवे लावल्यास, त्याबाबत फोटोच काय अन्य कोणत्याही गोष्टी केल्यास त्याला आमचा
आक्षेप नाही.
जनतेच्या पैशातून 200 रुपयांचा फराळ सरकार 303 रुपयांना ठेकेदाराला देऊन परत जनतेलाच देत आहे.
त्यामुळे याचे प्रदर्शन करण्याची गरज नाही, असे दानवे यांनी सरकारला खडसावले.

Web Title :- Ambadas Danve | vidhanparishad opposition leader ambadas danve criticized shinde fadanvis government on various state issues

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा