PGI नर्सनं विषारी इंजेक्शन घेऊन केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहीलं ‘हे’ कारण

चंडीगड  :  पोलीसनामा ऑनलाइन  –  चंडीगडमधील पीजीआयमध्ये काम करणाऱ्या एका नर्सने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. दविंदर कौर असं या नर्सचं नाव असून, ती नयागांवमध्ये रहात होती. हॉस्पिटलमधील नर्सिंग ऑफिसरसोबत काम करणाऱ्या चार नर्सेसच्या त्राासाला कंटाळून आपण आत्महत्या केल्याचे दविंदरने सुसाइड नोटमध्ये लिहिले होते. याआधीही दविंदरने गेल्या महिन्यात आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

त्यातून बरी झाल्यावर ती पुन्हा रूजू झाली आणि हॉस्पिटलमधील कामामुळे असलेल्या ताणामुळे तिने आत्महत्या केली. पोलिसांनी चिठ्ठीत उल्लेख असलेल्या चार नर्सेसवर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणाला अटक झालेली नाही .