Ambernath Crime | मित्र रंग लावण्याच्या भीतीने टेरेसवर गेला अन्….’; यंदाची धुळवड ठरली शेवटची!

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाइन – Ambernath Crime | राज्यभर धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी बेधुंद होत सणाचा आनंद घेतला. मात्र अंबरनाथमध्ये (Ambernath Crime) घडलेल्या एका दुर्दव्यी घटनेमुळे धुळवडीदिवशी एका कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मित्र रंग लावायला आल्यावर गच्चीवर लपण्यासाठी गेलेल्या तरूणाचा टेरेसवरून पडून 26 वर्षीय तरूणाचा मृत्यु (Accidental Death) झाला आहे.

 

नक्की काय झालं?
अंबरनाथमधील (Ambernath Crime) शिवाजीनगर (Shivajinagar) परिसरात ही घटना घडली आहे. मृत सुरज मोरे (Suraj More) आपला भाऊ तुषार मोरेसह (Tushar More) त्याचा मित्र अविनाश पाटील याला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्याच परिसरातील त्यांच्या काही मित्रांनी यांना पाहिल्यावर ते यांना रंग लावण्यासाठी पळत आले. त्यानंतर दोघे भाऊ इमारतीमध्ये गेले, यातील सुरज हा टेरेसवर गेला आणि त्याचा भाऊ तुषार पहिल्या मजल्यावर लपला.

 

तुषार पहिल्याच मजल्यावर असल्याने तो सापडला त्यांनी त्याला खाली आणत रंग (Color) लावत असताना सुरज खाली पडला.
सुरज इमारतीच्या डक्टमधून (Duct Of The Building) खाली कोसळला, सुरजच्या पायाला दुखापत झाली होती.
त्यानंतर त्याचा भाऊ आणि मित्रांनी त्याला उल्हासनगर (Ulhasnagar) येथील अंबरनाथ (Ambernath) रूग्णालयात नेले. मात्र डॉक्टारांनी त्याला मृत घोषित केलं.

 

दरम्यान, या घटनेमुळे मोरे यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रंग न लावून घेणं तरूणाला जीवावर बेतलं.
त्यामुळे प्रत्येकाने सण साजरे करताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

 

Web Title :- Ambernath Crime | friends were coming from the street ran to the terrace for fear of holi color and death in ambernath

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BMC Vs Narayan Rane | नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार ?; महापालिकेची राणेंना दुसरी नोटीस !

 

Folic Acid Benefits | पुरुषांमध्ये ‘ही’ एक महत्वाची गोष्ट वाढवते फॉलिक अ‍ॅसिड, जाणून घ्या याचे 5 मोठे फायदे आणि स्त्रोत

 

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेची मुख्य सभा आणि स्थायी समितीसह विषय समित्यांचेही कामकाज होणार; पण…