Coronavirus : ‘कोरोना’ग्रस्त रूग्णांना ‘ब्लड क्लॉटींग’चा धोका, लवकरच येऊ शकते अँटीव्हायरल औषध

न्यूयॉर्क : कोरोना व्हायरस (कोविड-19) मुळे सध्या संपूर्ण जग त्रस्त आहे. या धोकादायक व्हायरसमुळे अन्य गंभीर समस्यांचा धोकासुद्धा वाढला आहे. याबाबतीत जस-जसा अभ्यास होत आहे, तस-तसे नवे खुलासे समोर येत आहेत. एका नव्या अभ्यासात आढळून आले आहे की, कोरोनाग्रस्त रूग्णाच्या शरीरात ब्लड क्लॉटींग म्हणजेच रक्त गोठण्याचा धोका वाढू शकतो. यामुळे रूग्णाला स्ट्रोकचा सामनादेखील करावा लागू शकतो. तर अन्य एका अभ्यासात आढळून आले आहे की, अँटीवायरल औषधाद्वारे रूग्ण बरे होण्यास मदत होऊ शकते.

अमेरिकेच्या यूनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनुसार, या धोक्यांपासून वाचण्यासाठी प्राथमिक तपास आवश्यक आहे. थ्रोम्बोलेस्टोग्राफी (टीईजी) ने रक्ताची पूर्ण तपासणी होते. याद्वारे एखाद्या रूग्णाच्या ब्लड क्लॉटींगच्या क्षमतेचा शोध घेतला जाऊ शकतो. रक्त किती वेळात गोठते, किती गोठते आणि किती वेळात तुटते याची माहिती मिळू शकते. कोरोनामुळे एक्यूट किडनी इन्ज्युरीचाही धोका निर्माण होऊ शकतो, असे देखील एका अभ्यासात आढळून आले आहे.

एका संशोधनात संशोधकांनी हे प्रथमच दर्शवले आहे की, प्रथमपासूनच माहिती असलेल्या एका अँटीवायरल औषधाच्या मदतीने कोरोना व्हायरस (कोविड-19)चे रूग्ण लवकर बरे होऊ शकतात. हे औषध कोरोनातून वेगाने बरे होण्यासाठी उपयोगी आहे. फ्रंटियर्स इन इम्यूनोलॉजीच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, इन्टरफेरॉन (आयएफएन)-ए2बी औषधाने उपचार केल्यास रूग्णातील व्हायरस नष्ट करण्याच्या गतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. तसेच इम्फ्लेमेटरी प्रोटींसचा स्तरही कमी होऊ शकतो.

कॅनडाच्या टोरन्टो यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांना आढळून आले की, या औषधाने उपचार केल्यास श्वसनतंत्राच्या वरील भागातील व्हायरसच्या कालावधीत सरासरी सात दिवसांची घट आणता येऊ शकते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊन लावला आहे. यामुळे लोक आपल्या घरांमधून कैद आहेत. याचा सर्वात घातक परिणाम मुलांवर होत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार यामुळे मुलांच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात.