अमेरिकेत ‘कोरोना’चे थैमान, बाधितांची संख्या 45 लाखांवर

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जभरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. आतापर्यात अमेरिकेतील कोरोनाबिधितांच्या संख्येने तब्बल 45 लाखांचा टप्पा पार केला आहे. दुसरीकडे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल दीड लाख लोकांना प्राण गमवावे लागल्याची माहितीदेखील समोर आली.

वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसारही अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून मृतांची संख्याही दीड लाखांवर गेली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 53 हजार 447 जणांचा मृत्यू झाला. तर गेल्या 24 तासांमध्ये अमेरिकेत 1 हजार 267 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 50 हजार नव्या रुग्णांचीही नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाचा सर्वाधित फटका बसलेल्या देशांच्या यादीत ब्राझिल हा दुसर्‍या क्रमांकावर आहे. ब्राझिलमध्ये आतापर्यंत 25 लाख कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत तेथे 90 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या चोवीस तासांमध्ये ब्राझिलमध्ये 1 हजार 500 जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. कोरोनाचा सामना करण्यासाठी वापरण्यायोग्य असलेल्या 21 औषधांची शास्त्रज्ञांनी ओळख पटवली आहे. या औषधांचा वापर उपचारात फादेशीर ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.