पहिल्यांदाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत भारत बनला मुद्दा, दोन्ही पक्षांकडून संबंध सुधारण्यावर दिला जातोय जोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा निवडणुक प्रचाराच्या सुरूवातीपासून भारत एक मुद्दा बनला आहे. चीनच्या सोबत अमेरिकेचे बिघडलेले संबंध आणि अमेरिकन व्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात भारतीय वंशाच्या वाढत्या भूमिकेमुळे स्थिती ही आहे की, दोन्ही राजकीय पक्ष रिपब्लिकन आणि डेमोक्रेट सत्तेत आल्यानंतर भारतासोबत संबंध नव्या उंचीवर नेण्याची वक्तव्य दररोज करत आहेत.

भारताचा हितचिंतक असल्याचे सांगण्याची स्पर्धा
दोन्ही उमेदवारांकडून प्रयत्न होत आहे की, भारताचा खरा हितचिंतक तोच आहे. इतकेच नव्हे दोघांकडून भारताच्या बाबतीत एकमेकांच्या विचारांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जात आहे. या संदर्भात डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.

बिडेन यांनी ट्रम्प यांना घेरले
बिडेन यांनी ट्विटरवर लिहिले, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला घाणेरडा म्हटले आहे, ही आपल्या मित्राबाबत बोलण्याची पद्धत नाही आणि ही जलवायू परिवर्तनाची आव्हाने दूर करण्याची सुद्धा पद्धत नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी बिडेन यांच्यासोबत सार्वजनिक चर्चेत भारताला रशिया आणि चीन सोबत उभे करून या देशांची हवा प्रदूषित असल्याचे म्हटले होते.

दोन्ही पक्षांचे आपले दावे आणि आरोप
बिडेन यांनी एका लेखात लिहिले आहे की, कमला हॅरिस भारतासोबतच्या भागीदारीला महत्व देतात आणि ते दोघे मिळून ही भागीदारी आणखी मजबूत करतील. दरम्यान, रिपब्लिकन पार्टीकडून सतत हे कॅम्पेन चालवले जात आहे की, कशाप्रकारे बिडेन यांनी अडीच दशकांपूर्वी भारतासोबतचे संबंध बिघडवण्याचा प्रयत्न केला होता.

व्यवसायिक वीजा आणि चीन प्रकरण सुद्धा गरम
इतकेच नव्हे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरने एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, बिडेन यांची भूमिका चीनसाठी नरमाईची आहे, जे भारतासाठी योग्य नाही. या दरम्यान, डेमोक्रेट पार्टीकडून ट्रम्प प्रशासनाच्या व्यवसायिक वीजा देण्यासंबंधीच्या धोरणातील बदलाचा मुद्दा उपस्थित केला गेला आहे. यामुळे अमेरिकेच्या अर्थकारणावर कसा वाईटपरिणाम होईल हे सांगितले आहे.

दोन्ही पक्षांचा भारतीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
अमेरिकेच्या व्यवसायिक वीजाची घोषणा सुद्धा थेट भारताशी संबंधीत आहे. कारण ट्रम्प यांच्या वीजा धोरणाचा सर्वात मोठा तोटा भारतीय आयटी कंपन्या आणि आयटी कर्मचार्‍यांना झाला. यामुळे आता दोन्ही पक्षांकडून भारताशी संबंधीत मुद्दे आपआपल्या पद्धतीने उचलून धरले जात आहेत.

अबकी बार ट्रंप सरकार
मागच्या वर्षी हाऊडी मोदी कार्यक्रमात ज्याप्रकारे अबकी बार ट्रम्प सरकार ची घोषणा देण्यात आली होती, त्यावरून स्पष्ट झाले होते की, तेथील निवडणुकीत भारताला महत्व असणार आहे. सत्ताधारी रिपब्लिकन पार्टीकडून जारी व्हिडिओ प्रचार फिल्ममध्ये मोदी आणि ट्रम्प यांचे व्हिज्युअल खास प्रकारे वापरण्यात आले आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या भाषणात त्यांची तामिळ आई, मावशी आणि इडलीचा उल्लेख सुद्धा जाणकार राजकारणाशी जोडत आहेत.

खुप महत्वाची होईल टू-प्लस-टू चर्चा
राष्ट्रपती ट्रम्प यांच्याकडून भारतासोबतचे संबंध वाढवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. उद्या सोमवारी (26 ऑक्टोबर) अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मायकल पोम्पीयो आणि संरक्षण मंत्री मार्क एस्पर नवी दिल्लीत येत आहेत. येथे खुप महत्वाची टू-प्लस-टू चर्चा होणार आहे.

अमेरिकन निवडणुकीत भारताची सतत चर्चा असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे अमेरिकेत वोट देणार्‍या मुळ भारतीय वंशाच्या नागरिकांची वाढती लोकसंख्या हे आहे. अटलांटिक कौन्सिलच्या रिपोर्टनुसार ही संख्या सुमारे 40 लाख आहे.

You might also like