महागडी असणार अमेरिकेची ‘कोरोना’ वॅक्सीन, द्यावे लागतील 3700 पासून 4500 रूपयांपर्यंत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  जगात कोरोनावर अनेक ठिकाणी संशोधन आणि लसीवर काम चालू आहे. अशातच अमेरिकेत तयार झालेली लस बरीच महाग मिळू शकते. फाइनेंशियल टाइम्स या वृत्तपत्रानुसार, अमेरिकेतील ‘मॉडर्ना’ ही कंपनी आपली एका लसीला 3700-4500 घेण्याची योजना आखत आहे.

मॉडर्नाच्या लसीची किंमत Pfizer आणि BioNTech या अमेरिकन कंपनीच्या कोरोनाच्या लसीच्या किमतीपेक्षा 800 रुपये जास्त असेल. रिपोर्टनुसार मॉडर्ना कंपनी आपल्या दोन लसीच्या कोर्सला 3700-4500 रुपये घेणार आहे.

ही कंपनी त्यांची लस अमेरिका आणि दुसऱ्या मित्र देशांत लस पुरवणार आहे. आमची अमेरिकन सरकारसोबत लसीबद्दल चर्चा सुरू आहे, असं कंपनीचे प्रवक्ते म्हणाले आहेत. त्यांनी गोपनियतेमुळे लसीची किंमत सांगितली नाही.

याबद्दल रॉयटर्सच्या मतानुसार अजून मॉडर्नाच्या लसीची किंमत ठरली नसून अजून त्यावर चर्चा सुरू आहे. Pfizer, Moderna आणि Merck & Co या कंपन्यांनी सांगितले आहे की ते या लसींची विक्री फायद्यातच करणार आहेत. दुसऱ्या बाजूला johnson and johnson या कंपनीने लस ‘ना नफा’ या तत्वावर विकणार असल्याचे सांगितले आहे.

अमेरिकेने कोरोनावरील लस बनवण्यासाठी ‘ऑपरेशन वार्प स्पीड प्रोग्राम’ सुरू केलं आहे. यासाठी Moderna या कंपनीला 7476 कोटींचा निधी देखील दिला आहे.