ट्रम्प ज्युनिअर यांनी शेअर केली बनावट माहिती, ट्विटरची कारवाई

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरदरम्यान पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. ट्रम्प ज्युनिअर यांनी कोरोना विषाणूसंदर्भात ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर ट्विटरने तो व्हिडीओ हटवित तात्पुरत्या स्वरूपात त्यांना ट्विट करण्यापासून बॅन करण्यात आले होते.

डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनीन व्हिडीओ ट्विट करताच तो मोठ्या व्हायरल झाला. काही तासांतच लाखो लोकांनी तो पाहिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही तो व्हिडीओ पाहिला. पंरतु नंतर फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबने तो व्हिडीओ बॅन केला. या कारवाईनंतर अनेक जणांना संताप अनावर झाला आणि त्यांनी सोशल मीडिया सेन्सॉरशिपविरूद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाने काही नवी धोरणे आखली आहे.

कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा बनावट मजकुरांविरोधात सोशल मीडियाने झीरो टॉलरंस पॉलिसी स्वीकारली आहे. ट्रम्प ज्युनिअर यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये डॉक्टर अमेरिकन लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाटी मास्क परिधान करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत होते. ज्युनिअर ट्रम्प यांनी हा व्हिडीओ शेअर करत पाहावा, असे आवाहनही केले होते. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराबद्दलही ते सांगत होते. यापूर्वी काही वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.