US : स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवानंतर ‘कोरोना’ रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ,एकाच दिवसात 50000 पार

बाल्टीमोर : अमेरिकेत मागील चार दिवसात कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा वेग प्रचंड वाढला आहे. चार दिवसात प्रथमच कोरोना संक्रमितांची संख्या 50,000 च्या पुढे गेली आहे. तज्ज्ञांनी 4 जुलै अमेरिकन स्वातंत्र्य दिनानिमित्त होणार्‍या उत्सवाबाबत सावधानतेचा पूर्वइशारा दिला होता. या उत्सवानंतर अमेरिकेत कोरोना संक्रमितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

अमेरिका आणि ब्राझीलमध्ये कोरोना महामारीमुळे स्थिती नियंत्रणाच्या बाहेर चालली आहे. अमेरिकेत संक्रमित लोकांची एकुण संख्या 28 लाख 39 हजारपेक्षा जास्त झाली आहे. आतापर्यंत 1 लाख 29 हजार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. महामारीमुळे फ्लोरिडाचे सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर मियामीमध्ये कर्फ्यू लावण्याचा आदेश देण्यात आला आहे. तर, ब्राझीलमध्ये एका दिवसात कोरोनाची सुमारे 38 हजार नवी प्रकरणे समोर आली आहेत. यादरम्यान, एक हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा 15 लाख 77 हजारच्या पुढे गेला आहे, तर 64 हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसने मरणार्‍यांची संख्या सतत वाढत चालली आहे. जागतिक स्तरावर कोरोना व्हायरसने आतापर्यंत 5.30 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 188 देशांचे एकुण 1.12 कोटीपेक्षा लोक व्हायरसने संक्रमित झाल आहेत. कोरोनाने मृत्यू होण्याच्या बाबतीत अमेरिका आणि ब्राझील सर्वात पुढे आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठानुसार रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित लोकांची एकुण संख्या 1 कोटी 12 लाख 39 हजार 378 झाली आहे, तर यापैकी एकुण 5 लाख 30 हजार 110 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 60 लाख 44 हजार 414 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत.