बायडन यांच्या विजयादरम्यान अमेरिकेत वाढले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, एका दिवसात 1.30 लाख केस

वॉशिंग्टन : अमेरिकेने आपला नवा राष्ट्राध्यक्ष निवडला आहे. डेमोक्रेट्सचे जो बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्रध्यक्ष निवडले गेले आहेत. बायडन यांच्या विजयाचा जल्लोष अमेरिकेत साजरा केला गेला. एकीकडे अमेरिकत जल्लोषाचे वातावरण असताना दुसरीकडे कोरोना महामारीसुद्धा वेगाने पसरत चालली आहे. मागील चार दिवसांपासून अमेरिकेत एक लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर येत आहेत. मागील 24 तासात अमेरिकेत कोरोना व्हायरस संसर्गाची 1.30 लाखापेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत.

रॉयटर वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेत शनिवारी कोरोनाची कमीत कमी 1 लाख 31 हजार 420 नवी प्रकरणे समोर आली. लागोपाठ चौथ्या दिवशी कोरोना व्हायरसच्या प्रकरणात विक्रमी वाढ नोंदली गेली आहे. 17 राज्यांत शनिवारी एका दिवसात विक्रमी कोरोना प्रकरणांची नोंद झाली, तर 14 राज्यांनी हॉस्पीटलमध्ये दाखल रूग्णांच्या संख्येत वाढ नोंदवली आहे.

शनिवारी लागोपाठ पाचव्या दिवशी देशभरात मृतांची संख्या 1,000 पेक्षा जास्त होती. 10 राज्यांमध्ये आतापर्यंत नोव्हेंबरच्या पहिल्या 7 दिवसांत विक्रमी दैनिक मृत्यू नोंदले गेल आहेत. यामध्ये अर्कांसस, इडाहो, मिनेसोटा, नेब्रास्का, न्यू मॅक्सिको, नॉर्थ डकोटा, दक्षिण डकोटा, यूटा, वेस्ट व्हर्जिनिया आणि व्योमिंगचा समावेश आहे.

7 दिवसांपासून सरासरीपैकी प्रकरणात अमेरिकेत दररोज 100,000 पेक्षा जास्त नवी प्रकरणे रिपोर्ट करत आहेत. हा आकडा आशिया आणि युरोपच्या दोन सर्वात वाईट प्रकारे प्रभावित देश भारत आणि फ्रान्सच्या एकत्रित सरासरीपेक्षा जास्त आहे. प्रति व्यक्ति प्रतिदिवस नव्या प्रकरणांच्या आधारावर मिडवेस्ट सर्वात कठिण क्षेत्र बनले आहे. रॉयटर्सच्या आकड्यांनुसार, इलिनोईस मिडवेस्ट नवे केंद्र म्हणून समोर आले आहे, ज्यामध्ये मागील सात दिवसात 60,000 कोरोना ग्रस्तांची नोंद झाली आहे. राज्यात शनिवारी 12,454 पेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदली गेली, जी आतापर्यंतची सर्वात जास्त एका दिवसातील संख्या आहे.