1918 मध्ये देखील एवढं ‘लाचार’ झालं नव्हतं जग जेवढं आज ‘कोरोना’समोर झालंय, कोटयावधींचा झाला होता मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज मानव भलेही चंद्रावर पोहोचला असेल, पण कोरोना व्हायरसच्या लढाईत तो आज तेवढाच असहाय्य आहे जितका १९१८ मध्ये होता. १९१८ मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लूने जगभरात विनाश आणला होता आणि कोट्यवधी लोक त्याचा शिकार झाले होते. तेव्हाच्या आणि आजच्या काळात असाच फरक दिसत आहे की आज आपण तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असल्याचा दावा करतो.

तंत्रज्ञानाच्या युगात जिथे आपण चंद्रावर अंधाऱ्या जागेवर आपले यान उतरवण्यास सक्षम आहोत जे आजपर्यंत दूर राहिले होते. इतकेच नाही तर मंगळावर आपले यान उतरवण्यात आणि त्यावरील पाण्यासह इतरही अनेक गोष्टी शोधण्यात आपण यशस्वी झालो आहोत. आतापर्यंत आपण मंगळावर मानवी वस्तीचा ब्लू प्रिंट तयार करण्यात गुंतलो आहोत.

व्हायरस समोर काहीच नाही
परंतु या तंत्रज्ञानाच्या युगात जेव्हा इतक्या साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत, तरीही आपण या युगात एका विषाणू समोर काहीच नाही आहोत. संपूर्ण जगात ३७२६७९६ लोकांना संसर्ग झाला आहे आणि आतापर्यंत २५८३०५ लोकांचा मृत्यू झाला आहे, परंतु त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यास किंवा रोखण्यात आपले हात पूर्णपणे रिकामे आहेत.

लस शोधण्यात रात्रंदिवस व्यस्त आहेत शास्त्रज्ञ
शास्त्रज्ञ ही लस शोधण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांचे म्हणणे आहे की, ही लस तयार करण्यात जरी त्यांना यश आले तरी संपूर्ण जगात ती लस पोहोचवण्यास अद्याप एक ते दीड वर्षांचा कालावधी लागेल. इतकेच नव्हे तर हा प्राणघातक कोरोना विषाणू ज्या पद्धतीने बदलत आहे त्याच पद्धतीने त्याची लस बनवण्याच्या समस्येला सामोरे जावे लागेल, असे या वैज्ञानिकांचे मत आहे. त्यांचा असा विश्वास आहे की कोणत्याही प्रकारची लस किंवा औषध त्याला रोखण्यास सक्षम नाही. याच्या प्रत्येक प्रकारासाठी एक स्वतंत्र लस तयार करावी लागेल.

लसीची देखील कोणती गॅरंटी नाही
अलीकडेच अमेरिकन संशोधकांनी असेही म्हटले आहे की जगभरात कोरोना लस भविष्यात यशस्वी होईल याची शाश्वती नाही. प्रत्येकजण हे समजण्यात असक्षम आहे की जी व्यक्ती चंद्रावर पोहोचते आहे आणि मंगळावर वस्ती स्थायिक करण्याचे स्वप्न बघते, ती एखाद्या विषाणूने पराभूत कसे काय होते. पण हे वर्तमानाचे सत्य आहे. आज संपूर्ण जग एका विषाणूमुळे बंद करण्यात आले आहे. कारखान्यांतून निघणारा धूर गायब आहे, रस्ते, मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, रेस्टॉरंट्स आणि ऑफिसेसमध्ये दिसणारी गर्दी गायब आहे. हा प्राणघातक विषाणू कधी संपणार या दिवसाची वाट पाहत सर्व लोक आपल्या घरी बसले आहेत. पण हे कधी होईल याबद्दल कोणालाही काही माहिती नाही.

इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे
असे वाटू लागले आहे की, १०२ वर्षांनंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. या १०२ वर्षांमध्ये कोरोना विषाणूशिवाय, ज्या रोगाचा त्रास सहन केला तो स्पॅनिश फ्लू होता. १९१८ मध्ये आलेल्या साथीच्या रोगाने जगभरात ५० कोटीहूनही अधिक लोक संक्रमित झाले होते. या फ्लूने जगभरात सुमारे २-५ कोटी लोकांचा जीव घेतला होता. हे आकडे पहिल्या महायुद्धात मारले गेलेले एकूण सैनिक आणि नागरिकांच्या संख्येपेक्षा जास्त आहेत. भारतदेखील या परिणामापासून लांब नाहीये.

संपूर्ण जगासाठी जीवघेणा
स्पॅनिश फ्लूचा पहिला टप्पा सौम्य होता. परंतु काळाबरोबर याचा परिणाम जुलैपर्यंत दुसर्‍या टप्प्यावर पोहोचला होता आणि सप्टेंबरमध्ये हा संपूर्ण जगासाठी जीवघेणा बनला होता. यामुळे कोट्यवधी लोकांचा जीव गेला होता. स्पॅनिश फ्लूमुळे १८ लाख भारतीयांचा मृत्यू झाला होता. कोणत्याही देशातील मृत्यूच्या संख्येत हा आकडा सर्वाधिक होता. १४ व्या शतकातील ब्लॅक डेथ महामारी नंतर ही इतिहासातील सर्वात धोकादायक महामारी आहे. त्यावेळी जगाकडे त्याला संपवण्याची संसाधनेही नव्हती. लस, अँटी-व्हायरल औषध किंवा अँटिबायोटिकचा अभाव देखील होता. अशात एकमेकांपासून अंतर ठेवणे आणि क्वारंटाइन करणे यासारख्या उपायांचा अवलंब केला गेला होता.

अमेरिकन सर्जनचे म्हणणे
कोविड-१९ आणि स्पॅनिश फ्लूमध्ये काही समानता आहेत. हे दोन्ही विषाणू प्राण्यांद्वारे माणसात आले. यानंतर जसजसे संक्रमित लोक एकमेकांना भेटू लागले तसतसे या विषाणूचा हल्ला वाढत गेला. दोघांनाही क्राउड डिसीज म्हटले गेले. याचा अर्थ गर्दीतून पसरणारा रोग. १९१८ मध्ये या आजारामुळे केवळ एकट्या अमेरिकेत ६७५००० लोकांचा मृत्यू झाला होता.

त्यावेळी यूएस सर्जन जनरल रूपर्ट ब्लू यांनी लोकांना यापासून बचावासाठी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा आणि चेहरा झाकण्याचा सल्ला दिला. ते असेही म्हणाले होते की, जर कोणामध्येही लक्षणे दिसली तर त्याने स्वत:ला क्वारंटाइन करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी लोकांना इशारा दिला होता आणि सांगितले होते की सर्वात सोपा आणि सरळ उपाय म्हणजे एकमेकांपासून अंतर राखणे आहे.