अमेरिकेचा भारतला ‘दे धक्का’ ; H-1B व्हिसाची संख्या मर्यादित करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेने भारताला धक्का देणारा निर्णय घेण्याचा विचार करत आहे. अमेरिका एच -1 बी व्हिसाची संख्या मर्यादित करण्याचा विचार करीत आहे. हे नियम अशा देशांना लागू केले जातील जे विदेशी कंपन्यांना आपला डेटा सबमिट करण्यास सक्ती करतात. चलन आणि व्यापार यांच्यातील चढउतारामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे, असं एका न्यूज एजन्सीने सांगितलं आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पॉम्पीओ काही दिवसांनंतर भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याच पार्श्वभूमिवर H1B ची संख्या मर्यादित करण्याचा विचार केला जात आहे. ही बाब भारतासाठी चिंतेची आहे.

बुधवारी अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हिसा निर्बंधांविषयी यूएसला सांगितले. प्रत्येक वर्षी कोटा अंतर्गत, भारतातील केवळ 10-15 टक्के लोकांना एच -1 बी व्हिसा देण्यात येईल. अमेरिका दरवर्षी 85,000 लोकांना एच -1 बी व्हिसा देतो. यापैकी 70% व्हिसा भारताच्या लोकांना दिली जातात.

विदेशी कंपन्यांना केवळ भारतात डेटा ठेवण्यास सांगितले जाते. यामुळे कंपनीवर नियंत्रण ठेवणे सोपे होते. परंतु विदेशी कंपन्यांची शक्ती कमी होते. त्यामुळे अमेरिकेच्या कंपन्या यावर खुश नाहित. काही अमेरिकी कंपन्या भारताच्या डेटाबद्दल नवीन नियमांमुळे नाराज आहेत. विशेषतः मास्टरकार्डने डेटा स्टोरेजच्या नवीन नियमांवर निषेध केला आहे, असं सांगण्यात येत आहे.

अलीकडच्या काळात दरडोई उत्पन्न आणि त्यात केले जाणारे बदल यामुळे भारत आणि अमेरिकेच्या व्यवहारिक नात्यात दरी निर्माण झाली आहे. त्यात रविवारी भारताने अमेरिकी सामानांवर अधिकचा कर आकारण्याचे जाहिर केले आहे. त्यात काही काळापासून अमेरिकेनेही भारताला व्यापारात दिलेल्या काही सवलती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

एच 1 बी व्हिसा म्हणजे नेमक काय?

कोणत्याही ‘विशेष’ कामात कुशल असलेल्या विदेशी व्यावसायिकांसाठी एच 1 बी व्हिसा जारी केले जातो. सामान्यतः यासाठी उच्च शिक्षणाची आवश्यकता असते. कंपनीमध्ये, अर्जदारांना इमिग्रेशन विभागामध्ये एच -1 बी व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. १९९० मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ही व्यवस्था सुरू केली होती. मात्र आता याची संख्या जर कमी झाली. तर याचा सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन