भारताविरूध्द कधीही जिंकू शकणार नाही पाकिस्तान, इम्रान खाननं मैत्री केली तर बरं होईल : दलाई लामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ माजला आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांमधील तणाव देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचदरम्यान तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी पाकिस्तान सरकारला याप्रकरणी सल्ला दिला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर भडकलेल्या पाकिस्तानला सल्ला देताना दलाई लामा म्हणाले कि, या मुद्द्यावर पाकिस्तान कधीही भारताविरुद्ध जिंकू शकत नाही.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले कि, पाकिस्तानची अवस्था सध्या खूप वाईट असून त्यांना देखील ते चांगल्याप्रकारे माहित आहे. इम्रान खान यांना देखील माहित आहे कि, जर भारताबरोबर युद्ध झाले तर पाकिस्तान जिंकणार नाही. त्यामुळे भारताशी मैत्री करून सौहार्दाचे संबंध तयार करणे पाकिस्तानच्या फायद्याचे आहे.

भारत-पाकिस्तान फाळणी चुकीची
याविषयी बोलताना त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर जोर देत म्हटले कि, भारत-पाकिस्तान मधील फाळणीच चुकीची झाली आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटले कि, लडाख आणि जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित राज्य घोषित करणे योग्य निर्णय आहे कि नाही हा अवघड प्रश्न आहे. मात्र पहिल्यांदा भारत आणि पाकिस्तानची फाळणीच चुकीच्या पद्धतीने झाली आहे. गांधीजी देखील याच्याविरुद्ध होते.

पाकिस्तानपेक्षा जास्त मुसलमान भारतात
दलाई लामा यांनी बोलताना म्हटले कि, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीला काही कारणच नव्हते. त्यावेळी देखील भारतात सर्व राज्यात मुस्लिमांची संख्या पाकच्या तुलनेत सर्वात जास्त होती.

नेहरूंपासून ते मोदींपर्यंत आठवणी
यावेळी बोलताना दलाई लामा यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ते आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांच्या आठवणी ताजा केल्या. नेहरूंबरोबर त्यांची सर्वात पहिली भेट 1954 मध्ये चीनच्या पंतप्रधानाने आयोजित केलेल्या भोजन समारंभात झाली होती. त्याचबरोबर राजीव गांधी हे अतिशय बुद्धिमान होते,असेदेखील त्यांनी म्हटले.

आरोग्यविषयक वृत्त –