Amit Raj Thackeray On Vasant More | अमित ठाकरेंनी उडवली वसंत मोरेंची खिल्ली, ”त्यांना पंतप्रधान व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत, मनसेकडून…”

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Amit Thackeray On Vasant More | पुणे लोकसभा निवडणुकीत (Pune Lok Sabha) आता रोज नवनविन राजकीय घडामोडी घडत आहेत. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे पुण्यात आले आहेत. यावेळी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी त्यांची भेट घेतली असता ठाकरे यांनी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचे आश्वासन दिले. यानंतर अमित ठाकरेंनी गप्पागप्पांमध्ये राजकीय टोलेबाजी करत वंचितचे Vanchit Bahujan Aghadi (VBA) उमेदवार वसंत मोरे यांची खिल्ली देखील उडवली. (Amit Thackeray On Vasant More)

राज ठाकरे यांच्या मनसेने मला पाठिंबा द्यावा, अशी इच्छा वसंत मोरे यांनी व्यक्त केली होती. त्यावर अमित ठाकरे म्हणाले की, वसंत मोरे यांना पंतप्रधान व्हायचे आहे. ते सोशल मीडियाच्या (Social Media) आहारी गेले आहेत. त्यांनी मनसेकडून (MNS) पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा उमेदवारी सोडावी, राज ठाकरेंचा आदेश पाळावा आणि महायुतीच्या प्रचाराला लागावे.

अमित ठाकरे म्हणाले, मोदी सरकारला देशात ३०० च्या आसपास जागा मिळतील. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच पाठिंब्याचा निर्णय घेतला असावा. जे पदाधिकारी महायुतीविरोधात प्रचार करणार त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

मविआबाबत Mahavikas Aghadi (MVA) अमित ठाकरे म्हणाले,
मुंबईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मविआला एकही जागा मिळणार नाही.
त्यांच्या विरोधात वातावरण आहे. तसेच राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)
यांची मुंबईत एकत्र सभा (Mumbai Sabha) होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक

Shewalwadi Pune Firing Case | पुणे हादरलं, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार