राजकीय

दिल्लीमध्ये काँग्रेसच्या ‘तुकडे-तुकडे’ गँगनं पसरवली ‘हिंसा’, आता धडा शिकवण्याची ‘वेळ’ : अमित शहा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत विरोधी पक्ष संभ्रम पसरवत असून ते लोकांमध्ये या कायद्याबद्दल चुकीचा समज निर्माण करत आहेत. त्यांच्यामुळे देशाच्या राजधानीचे वातावरणही खराब होत आहे. देशात अशांती पसरवण्यामागे तुकडे-तुकडे गँगचाच हात आहे, असे घणाघाती आरोप अमित शहा यांनी विरोधी पक्षावर केले आहेत. दिल्ली विकास प्राधिकरणाच्या कार्यक्रमाबद्दल बोलताना शहा म्हणाले की, दिल्लीत पूढे भाजपचे सरकार येणार असून केजरीवाल सरकारची दिल्लीतील वेळ आता संपली आहे.

पुढे शहा म्हणाले की, संसदेत कॅबवर वाद चालू असताना कोणी काहीही बोलले नाही. परंतु हा कायदा अंमलात येताच त्याबद्दल अफवा पसरवण्यास सुरुवात झाली. राजधानी दिल्लीचे वातावरण खराब करण्यास काँग्रेसची तुकडे-तुकडे गॅंग जबाबदार आहे.

मोदींनीही काँग्रेसवर प्रश्न उपास्थित करत सीएए नंतर दिल्लीतील सीलमपूर, झफराबाद आणि दयालपूरमध्ये हिंसाचार झाला असेल तर स्पष्ट करा. तसेच दिल्लीतील हिंसाचारासाठी मोदींनी कॉंग्रेसला जबाबदार ठरवले आहे.

रविवारी झालेल्या मोर्चात मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांचे काही शहरी नक्षलवादी मुस्लिमांना डिटेंशन कॅम्पमध्ये पाठवणार आहेत, असे सांगून भीतीचे वातावरण पसरवत आहते. पण मुस्लिमांना कोणत्याही डिटेंशन कॅम्पमध्ये पाठवणार नसून कोणताही डिटेंशन कॅम्प नाहीये.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

Back to top button