अमित शहा जनरल डायरपेक्षा कमी नाहीत, राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याची टीका

पोलीसनामा ऑनलाइन : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात उग्र आंदोलन होत आहे. दिल्लीतील आंदोलनाप्रसंगी जामिया मिलिया विद्यापीठात घुसून पोलिसांनी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करत तोडफोड केली होती. याचे तीव्र पडसाद देशात उमटत आहेत. यावरून आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादीनेही मोदी सरकारवर जहाल टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जनरल डायरपेक्षा कमी नाहीत, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी जामिया विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीबाबत ट्विट करून म्हटले आहे की, ज्या पद्धतीने जनरल डायरने जालियनवाला बागमध्ये नागरिकांवर गोळीबार केला होता, त्याचप्रमाणे अमित शाह हे देशातील नागरिकांवर गोळीबार करत आहेत. अमित शाह हे जनरल डायरपेक्षा कमी नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे काही म्हटलेले आहे ते सर्व योग्यच आहे. असे आमदार मलिक यांनी म्हटले आहे.

दिल्लीत जे काही झाले ते जालियनवाला बागची आठवण करुन देणारे आहे. देशात अशांतता आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरत आहे. दिल्लीत विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. जणू काही जालियनवाला बागेतले दिवस परत आले की काय? जालियनवाला बाग झाला तेव्हा ज्याप्रमाणे हिंसाचार घडला होता, तसेच वातावरण देशात पुन्हा निर्माण केले जात आहे की काय? अशी भीती देशात आणि तरुणांच्या मनात आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच व्यक्तव्याचा आधार घेत नवाब मलिक यांनी गृहमंत्री अमित शहा यांना जनरल डायरची उपमा दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/