अमित शहा यांनी घेतली धोनीची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय जनता पक्षाच्या संपर्क फॉर समर्थन उपक्रमांतर्गत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी भारताचा स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांची भेटी घेतली. यावेळी गेल्या चार वर्षांमध्ये केंद्र सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी धोनीसमोर मांडला आणि सोबत सरकारने केलेल्या कामांची माहिती असलेली एक पुस्तिकाही भेट दिली. यावेळी शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

[amazon_link asins=’B00BHXYT5Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0620f368-9931-11e8-bda4-a9836a798291′]

या भेटीनंतर अमित शहा यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली. संपर्क फॉर समर्थन उपक्रमांतर्गत जागतिक क्रिकेटमधल्या सर्वोत्कृष्ट फिनिशरची आज भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी गेल्या चार वर्षांमध्ये राबवलेल्या उपक्रमांबाबत त्यांना माहिती दिली. असं ट्विट अमित शहा यांनी केले़
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने संपर्क फॉर समर्थन हा उपक्रम सुरु केला आहे. यापूर्वी अमित शहा यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित , उद्योगपती रतन टाटा, गायिका लता मंगेशकर, घटना तज्ञ सुभाष कश्यप, स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, योग गुरु बाबा रामदेव, माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचीही भेट घेतली होती.