‘कोरोना’ आणि ‘लडाख’ वादावर HM अमित शहा यांचे महत्वाचे विधान, म्हणाले – ‘PM मोदींच्या नेतृत्वात भारत दोन्ही युद्धे जिंकणार’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात 15 जूनच्या रात्री भारत आणि चीन सैनिकांत झालेल्या हिंसक चकमकीत संघर्षात 20 भारतीय सैनिक शहिद झाल्यानंतर कॉंग्रेस सतत केंद्र सरकारला धारेवर धरत आहे. कॉंग्रेसच्या सर्व आरोपांना उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, मी हे स्पष्ट करू इच्छितो कि, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत दोन्ही युद्धे जिंकणार आहे. कोरोनाच्या युद्धाबरोबरच पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील वाढीव तणावाचे युद्ध भारत लवकरच जिंकेल.

वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, आम्ही या विषयावर संसदेत चर्चा करण्यास तयार आहोत. संसद चालणार आहे आणि कोणाला सीमाप्रश्नावर चर्चा करायची असेल तर आम्ही त्यावर चर्चा करू. 1962 पासून आज पर्यंत दोन – दोन होऊन जाऊदेत. कोणालाही चर्चेची भीती वाटत नाही. पण जेव्हा देशातील जवान संघर्ष करीत आहेत, तेव्हा सरकारकडून भूमिका घेत काही ठोस पावले उचलली जात आहे, तेव्हा पाकिस्तान आणि चीनला आनंद होईल असे कोणतेही विधान केले जाऊ नये. अमित शहा पुढे म्हणाले की, कोरोनाविरूद्ध भारत सरकार चांगला लढा देत आहे. मी राहुल गांधींना कोणत्याही प्रकारचा सल्ला देऊ शकत नाही. राहुल गांधींना सल्ला देणे हे त्यांच्या पक्षाचे काम आहे. काही लोक ‘वक्रदशेथ’ आहेत. त्यांना योग्य गोष्टी चुकीच्याही दिसतात. कोरोनाविरुद्ध भारताने चांगली झुंज दिली आणि आमची आकडेवारी जगापेक्षा चांगली आहे.

अमित शहा म्हणाले की, केंद्र सरकार भारतविरोधी प्रचारात लढा देण्यास सक्षम आहे, परंतु इतक्या मोठ्या पक्षाचे माजी अध्यक्ष असे छोटेखानी राजकारण करतात हे पाहून फार वाईट वाटले. सरेंडर मोदींच्या ट्विटचा संदर्भ देत अमित शहा म्हणाले, कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांनी स्वत: याबद्दल विचार करण्याची गरज आहे. भारतात राहुल गांधी यांच्याकडून केलेली वक्तव्य पाकिस्तान आणि चीनमधील हॅशटॅग बनवून वापरत आहेत. काँग्रेस पक्षाला यावरही विचार करायला हवा कि, त्यांच्या पक्षाच्या नेत्याचे वक्तव्य चीन आणि पाकिस्तानला प्रोत्साहन देत आहे. तेही अश्या वेळी जेव्हा देश संकटात आहे.

दिल्लीत वेगाने बदलतीये कोरोनाची परिस्थिती
गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या मुलाखतीत दिल्लीतील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली. या दरम्यान त्यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा उल्लेख केला की त्यांनी सांगितले होते की 31 जुलैपर्यंत दिल्ली कोरोनाचे 5.5 लाख रुग्ण होतील. यामुळे दिल्लीतील लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. अमित शहा म्हणाले की, मी 14 रोजी समन्वय बैठक घेतली होती. आज मी म्हणू शकतो की, दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचे जे वक्तव्य होते, ती परिस्थिती आता दिल्लीत येणार नाही. राजधानीत 30 जूनपर्यंत कंटेनमेंट झोनमधील प्रत्येक घराचे सर्वेक्षण केले जाईल. आम्ही चाचणीत बरीच वाढ केली आहे. नंतर घरोघरी सर्वेक्षण केले जाईल.