अमित शहांचा उद्धव ठाकरे यांच्याकडे मैत्रीचा हात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा  मुंबई दौऱ्यावर असून . या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर दोन तास बैठक पार पडली . या दोघांमध्ये तब्ब्ल दोन तास चर्चा रंगली. या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली . या बैठकीदरम्यान सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र चर्चा सकारात्मक होती एवढे कळाले  आहे.

भाजपने आपल्या दुरावलेल्या मित्रांसह अन्य पक्षांच्या प्रमुखांचा रागरुसवा काढून पुन्हा एकदा त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी ‘संपर्क फॉर समर्थन’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटी आधी भाजपावर टीका करणारी शिवसेना पुन्हा एकदा मवाळ होताना दिसली. कारण अमित शाह आणि उद्धव ठाकरे येत्या महिन्यात दोन ते तीन बैठका घेणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  समन्वय वाढवण्यासाठी दोन्ही पक्षांनी हा निर्णय घेतला असल्याचे  समजत आहे. यानिमित्ताने दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेला तणावही निवळेल अशी दोन्ही पक्षांना अपेक्षा आहे.

मागील चार वर्षांपासून शिवसेना-भाजपामध्ये असलेली नाराजी आणि मतभेदांची दरी दूर करणे हा या बैठकीमागे महत्वाचा उद्देश होता . स्वत: भाजपा अध्यक्षांनी युतीची तयारी दाखवली आहे. मित्रपक्षांमध्ये मतभेद होत असतात असे शहा म्हणाले. त्यामुळे मैत्रीचा चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात आहे. भाजप कडून मिळणाऱ्या दुय्य्म वागणुकीमुळे  शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती . पण प्रत्यक्षात शहांच्या स्वागतासाठी मातोश्रीने कुठलीही कसूर ठेवली आली. इतकेच काय अमित शहा यांच्यासाठी खास त्यांच्या आवडीचा गुजराती मेन्यू बनवण्यात आला  होता. एकूणच दोन्ही बाजूंनी सकारात्मक संदेश दिला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल आणि विविध सर्वेक्षण चाचण्यांचा कौल पाहिला तर २०१९ मध्ये भाजपाला केंद्रात स्वबळावर सत्तेत येणे शक्य नाहीय. त्यांना मित्रपक्षांच्या टेकूची गरज लागणार आहे. पालघरची लोकसभेची जागा भाजपाने जिंकली असली तरी शिवसेनेच्या आणि भाजपाच्या मतांमध्ये फार अंतर नाही. लोकसभेलाही दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले तर भाजपाला निश्चित फटका बसू शकतो. त्यामुळे भाजपाने आता मैत्रीची पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.