बिग बी अमिताभ बच्चन आता दिसणार तृतीयपंथीयांच्या भूमिकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बी अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक आव्हानात्मक भूमिका केल्या आहेत. मग ती ‘पा’ मधील छोट्या मुलाची भूमिका असो किंवा ‘पिकू’ मधील वृद्ध व्यक्तीची भूमिका असो त्यांना मिळलेल्या प्रत्येक भूमिकेचं त्यांनी सोनं केलं आहे. पण आता एका नव्या चित्रपटात आतापर्यंत कधीच न केलेल्या भूमिकेत ते दिसणार आहेत. अमिताभ ‘कंचना’ या चित्रपटात तृतीयपंथीयाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

एका हिंदी वृत्तसमूहाने दिलेल्या वृत्तानुसार कंचना हा तामिळ हॉरर चित्रपट मुनी -२ वर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षयच्या पात्राला चित्रपटात राघव असे नाव देण्यात आले आहे.

कंचनाचा आत्मा तिच्या मारेकऱ्यांचा बदला घेण्यासाठी राघवच्या शरीरात शिरतो. या चित्रपटात कियारा आ़डवाणी ही अक्षय कुमारच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटींग नुकतेच सुरू झाले आहे. या चित्रपटातील भूमिकेमुळे कियारा देखील चर्चेत आली आहे.

Loading...
You might also like