डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग बी’ अमिताभ करतात ‘एवढे’ तास काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची प्रकृती मागील काही दिवासांपासून ढासळली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून घरी आल्यानंतर त्यांना सक्तीची विश्रांती घेण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच कम न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, बीग बी यांनी डॉक्टरांचा सल्ला न ऐकता त्यांनी कामाला सुरु ठेवले आहे. त्यांचे लिखाणही सुरु आहे.

https://tmblr.co/ZwrX5v2m59Xge

बीग बी यांनी अलीकडेच ब्लॉग लिहला आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी एका दिवसात 18 तासांची शिप्ट करत आहेत. काम शिल्लक असल्याने आणि जेव्हा ते रुग्णालायात होते तेव्हा त्यांचे काम शिल्लक राहिले. एवढेच नाही तर बीग बी असेही लिहतात की एकाच दिवसात त्यांनी आपल्या कौन बनेगा करोडपतीच्या तीन एपिसोडचे शुटिंग केले. आजारी असताना देखील बीग बी यांचा कामाचा उत्साह तरुणाला देखील लाजवेल असा आहे.

आपल्या ब्लॉगमध्ये लिहताना बीग बी सांगतात, हो सर, मी काम करतो. मी दररोज काम करतो. मी कालही काम केलं होतं, जे 18 तासानंतर पूर्ण झाले. यामुळे मला प्रेम आणि आशीर्वाद मिळतात. प्रकृती खराव असल्यामुळे अमिताभ बच्चन 25 व्या कोलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले नव्हते. या फेस्टिव्हलमध्ये अमिताभ बच्चन मागील सहा वर्षापासून सहभागी होत आहेत. मात्र, यंदा तब्येत खराब असल्याने ते सहभागी झाले नाहीत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like