MLA Amol Mitkari | आ. मिटकरींचा पंकजा मुंडेंना सल्ला; म्हणाले – ‘ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामु मोठा चतुर आहे, हे विसरू नका’

अकोला न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) यांना मंत्रिपद दिल नाही. या मुद्यावरून मुंडे समर्थक आक्रमक होत पदाचे राजीनामे दिले होते. यावरून काल भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंडे समर्थकांशी सवांद साधतेवेळी राज्यातील भाजप नेत्यांवर पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा. मु. मोठा चतुर आहे, हे विसरू नका, असा एक सल्ला आमदार मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) म्हणाले, ‘ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे, हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलं आहे. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासनपण आहेत. ‘नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका, असं देखील आमदार मिटकरी यांनी म्हटलं आहे. असं म्हणत त्यांनी भाजप (BJP) नेत्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. असं मिटकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे. यावरून सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

‘मला प्रवास खडतर दिसतोय. मागेही खडतर होता. पुढेही खडतर आहे.
मी आज निवडणुकीत पडले असले तरी संपले नाही.
मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते.
परंतु, मी संपलेली नाही. मी आहे. मी तुमच्या जीवावर आहे, असं त्या म्हणाल्या.
‘5 पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो.
मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तेव्हापर्यंत करते जोपर्यंत शक्य आहे. आम्ही कुणालाच भीत नाही.
मी कुणाचा निरादार करत नाही. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा आदर करते.
मला स्वतःसाठी काही नको, मला तुमच्यासाठी हवं आहे.
मी पदावर नाही. मी आज तुमच्या पालकत्वाच्या भूमिकेत आहे.
मला कशाचीही आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडें (Pankaja Munde) यांनी म्हटलं होतं.

Web Title : amol mitkari advised pankaja munde over bjps politics in maharashtra

Pune Crime | आई-वडिलांच्या वाढदिवसानिमित्त टिळक रस्त्यावरील हॉटेलचं जेवण मागवणं पडलं 50 हजाराला, जाणून घ्या प्रकरण

Maharashtra Unlock | महाराष्ट्रातील निर्बंध शिथिल होणार?

Pune Crime | पुण्यात संपत्तीच्या वादातून सुनेकडून वृध्द सासू अन् पतीला मारहाण, मौल्यवान वस्तूंची तोडफोड करत ‘राडा’