Amravati Crime | दुर्देवी ! एकाच कुटुंबातील तब्बल 11 जणांना विषबाधा; 7 वर्षीय मुलासह आई-वडिलांचा मृत्यू

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Amravati Crime | अमरावतीच्या (Amravati Crime) चिखलदरा (Chikhaldara) तालुक्यातील डोम येथील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथील एका कुटुंबातील तब्बल 11 सदस्यांना विषबाधा (Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. यात 7 वर्षाच्या मुलाबरोबर त्याच्या आईवडिलांचा प्राण (Death) गेल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, विषबाधा नेमकी झाली कशामुळे? याचं कारण अजून (Amravati Crime) समजलं नाही.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना (26 ऑगस्ट) रोजी घडली. यापैकी आयुष बुधराज बछले (Ayush Budharaj Bachle) (वय, 7) याचा मृत्यू घरीच झाल्याची माहिती मिळाली. त्यातील अन्य 10 जणांना काटकुंभ प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने काटकुंभ येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चुरणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यास सांगितले. त्या 10 पैकी आयुषच्या आईवडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने चुरणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अमरावतीला नेण्यास सांगितले. मात्र उपचारावेळी बुधराज बछले (Budharaj Bachle) यांचा जिल्हा रुग्णालयात शनिवारी (28 ऑगस्ट) रोजी मृत्यू झाला. आणि रविवारी (29 ऑगस्ट) रोजी आई लक्ष्मी बछले (Lakshmi Bachle) यांचा सुपर स्पेशालिटीच्या ICU मध्ये मृत्यू (Death) झाला.

चुरणीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. साहेबराव धुर्वे (Dr. Sahebrao Dhurve) म्हणाले, ‘रुग्णालयात एकूण 10 जण दाखल करण्यात आले होते. पैकी बुधराज बछले व लक्ष्मी बछले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अमरावतीला रेफर केले. तर, कुटुंबातील इतर 8 जणांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःहून सुटी घेतली असल्याचा त्यांनी सांगितले. तसेच, चिखलदराचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पाटील (Dr. Aditya Patil) यांनी सांगितलं की, ‘शुक्रवारी जिल्हास्तरावरून डॉक्टरांच्या साथरोग चमूने गावातील पाण्यासह अन्य ठिकाणी तपासणी केलीय. परंतु, काहीच आढळून आले नाही. म्हणून या घटनेचा तपास आता पोलिस (Police) करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

डोमा येथील बुधराज बछले यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी लक्ष्मी बछले यांच्यावर सुपर स्पेशालिटीच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दोघांचेही शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्याचा रिपोर्ट आल्यावर खरे कारण पुढे येईल. असे अमरावती जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम (District Surgeon Dr. Shyamsunder Nikam) यांनी सांगितले.

हे देखील वाचा

Pune Police | पुण्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; महिन्याभरापुर्वी झालं होतं पत्नीचं निधन

Pune News | पुण्यात बांगलादेशींची घुसखोरी ! मिलिटरी इंटेलिजन्सने दिली पुणे पोलिसांना माहिती, चौकशी सुरु

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Amravati Crime | Unfortunate! Poisoning of 11 members of the same family; Death of parents with 7-year-old child

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update