५ जिल्हयातील २२ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर अमरावती परिक्षेत्रात येणार्‍या अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलढाणा जिल्हयातील तब्बल 22 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या अमरावती परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी आज (सोमवारी) केल्या आहेत.

बदली करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कसांत कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे. सतिश उत्‍तमराव जाधव (अमरावती ग्रामीण ते यवतमाळ), सुधीर भिमराव पाटील (अमरावती ग्रामीण ते वाशिम), आधारसिंग सरदारसिंग सोनोने (अमरावती ग्रामीण ते वाशिम), अनिल विश्रामजी जुमळे (अकोला ते यवतमाळ), दिगंबर भिकाजी इंगळे (बुलढाणा ते वाशिम), प्रदिप सोमा साळुंके (बुलढाणा ते यवतमाळ), बळीराम रखमाजी गिते (बुलढाणा ते वाशिम), सोमनाथ मधुकर जाधव (बुलढाणा ते वाशिम), श्रीमती रिता लक्ष्मण उईके (यवतमाळ ते अकोला), अनिल आत्माराम पाटील (यवतमाळ ते बुलढाणा), संजय एकनाथ खंदाडे (यवतमाळ ते वाशिम), धनंजय उत्‍तम जगदाळे (यवतमाळ ते वाशिम), हनुमंत अमृतराव गायकवाड (यवतमाळ ते बुलढाणा), रमेश बाजीराव जायभाये (वाशिम ते बुलढाणा), राजेंद्र प्रल्हाद पाटील (वाशिम ते अमरावती ग्रामीण), गजानन महादेव गुल्हाणे (वाशिम ते अकोला), हरिष श्रीकृष्ण गवळी (वाशिम ते अकोला), सुरेश हरिभाऊ नाईकनवरे (वाशिम ते अकोला), मोतीराम महादेव बोडखे (वाशिम ते बुलढाणा), पितांबर सोहणलाल जाधव (वाशिम ते यवतमाळ), विजय रूपराव मगर (अकोला-पोस्टै. बोरगांव मंजु ते अकोला-अकार्यकारी पदावर) आणि असलम इसा खान (यवतमाळ-पोस्टे घाटंजी ते यवतमाळ-अकार्यकारी पदावर)