अमरावती : सहाय्यक रचनाकारास 2.5 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं पकडलं

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन  –  अमरावती येथील सहायक नगर रचनाकारास अडीच हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. आज सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.
मो.रफी मो.निसार कुरेशी (वय 38) असे पकडण्यालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

कुरेशी हे अमरावती कार्यालयात सहायक नगर रचनाकार आहेत. यातील तक्रारदार व त्यांचे मित्र यांनी प्लॉट खरेदी केला होता. या खरेदी केलेल्या प्लॉटचे विभाजन करत परवानगीच्या फाईलवर वरिष्ठांची (साहेबांची) सही घेऊन उपविभागीय कार्यालय चांदुर रेल्वे येथे पाठविण्याकरिता लोकसेवक कुरेशी यांनी तक्रारदार यांना अडीच हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सायंकाळी सापळा कारवाईत लोकसेवक कुरेशी यांना अडीच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, पोलिस निरीक्षक रुपाली पोहनकर यांच्या पथकाने केली.