Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना सल्ला; म्हणाल्या – ‘नागपुरात आल्यावर सावजी मटण खा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) याही मागे नाहीत. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमी कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्यावरुन एक विधान केले आहे.

 

 

शिवसंवाद (Shivsena Sanvad Melava) दौऱ्याअंतर्गत शिवसेनेचे सर्व खासदार 22 ते 25 मार्चपर्यंत मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भाच्या (Vidarbha) दौऱ्यावर येणार आहेत. संघटनात्मक बांधणी आणि जिल्हा परिषद गटापर्यंत पदाधिकाऱ्यांशी संवाद यासाठी हा दौरा शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यामध्ये संजय राऊत नागपूरचा (Nagpur) दौरा करणार आहेत.

 

‘नागपुरात आल्यावर सावजी मटण (Saoji Mutton) नक्की खा’, अशी प्रतिक्रिया नागपूर दौऱ्यावर येणाऱ्या संजय राऊत यांना अमृता फडणवीस यांनी दिली.
पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. आज गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या मुलीचे लग्न गाजत आहे,
आणि मी त्याचा आनंद घेत आहे. मला काहीच माहिती नाही काय घोळ सुरु आहे. मी माहिती घेऊन बोलेल,
असेही अमृता फडणवीस म्हणाल्या. आता अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या सल्ल्याला संजय राऊत कसे प्रत्युत्तर देतात हे पहावे लागेल.

 

Web Title :- Amruta Fadnavis | amruta devendra fadnavis sanjay raut shiv sena when you come to nagpur eat saoji mutton

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय उद्योग – व्यापारास संधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चासत्रात चर्चा

 

Sharad Pawar On Pune Airport Issue | पुणे विमानतळाचा प्रश्न 15 दिवसात मार्गी लावणार – शरद पवार

 

FMCG Price Increase | 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात रोजच्या वापरातील ‘या’ गोष्टींचे दर, कंपन्यांनी केली तयारी