Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांचा ठाकरे सरकारला खोचक सवाल; म्हणाल्या – ‘अनिल देशमुख, परमबीर सिंह हनिमूनला गेले आहेत का? (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amruta Fadnavis | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Former Mumbai CP Parambir Singh) हे दोघेही बेपत्ता झाल्या असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. हायकोर्टात (High Court) बुधवारी झालेल्या सुनावणीत सरकारने सिंह हे बेपत्ता झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तर राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देशमुख आणि सिंह यांच्या बेपत्ता होण्यावरून राज्य सरकारवर (Maharashtra Government) निशाणा साधला आहे. देशमुख आणि सिंह हे कुठे हनिमूनला गेले आहेत का? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. इतकेच नाही तर त्यांनी एक पोलीस आयुक्त असो किंवा माजी गृहमंत्री असो, हे कुठे हनिमूनला चाललेत हे माहित नाही. पण हे व्हायला नको. जर कोणाला ते दिसले तर जरूर सांगा अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी टीका केली आहे.

 

एनसीबीकडून (NCB) सुरु असलेल्या ड्रग्ज विरोधातील कारवाईचेही त्यांनी समर्थन केले. महाराष्ट्रात लोक ड्रग्ज घेऊन फिरत असतील ते चांगले नाही. त्यांना लगेच तुरुंगात टाकले पाहिजे हा माझा वैयक्तिक विचार नाही. पण अशांना सुधारणागृहाची जास्त आवश्यकता आहे. त्या आधी त्यांनी ड्रग्ज कोठून आणले, त्याचे नेटवर्क काय हे कळायला पाहिजे, असेही फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या.

 

 

सक्तवसुली संचलनालयाने (ED) 100 कोटींच्या खंडणी घोटाळ्यात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (NCP Leader Anil Deshmukh) यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस (ed issues lookout notice against former home minister anil deshmukh) बजावल्याचे कळते. मात्र मुंबईत असणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने (ED) या गैरव्यवहाराचा तपास सुरू केला. या प्रकरणात ईडीने आतापर्यंत देशमुख यांना चौकशीसाठी 5 वेळा समन्स बजावले आहेत. मात्र त्यांनी चौकशीला उपस्थित राहण्याचे टाळले आहे. देशमुख यांनी या विरोधात सुप्रीम कोर्टाचे (supreme court of india) दार ठोठावले होते, मात्र तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही.

 

परमबीर सिंह रशियात गेल्याची चर्चा

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप
करणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे गेल्या काही दिवसापासून तपस यंत्रणांना सापडेनासे झाले आहेत.
सिंग हे परदेशात गेले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
त्यामुळे राज्य सरकारने सिंग यांच्याविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस काढली
असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी सांगितली.
सरकारच्या परवानगीशिवाय ते अधिकारी म्हणून परदेशात जाऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

 

सिंह हे देश सोडून गेल्याचा खुद्द तपास यंत्रणांनाच संशय आहे.
कारणही तसेच आहे ऑगस्ट महिन्यामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) अनेकदा सिंग यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
मात्र, तरीदेखील सिंह चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे नेमके परमबीर सिंग गेले कुठे? असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे.

 

Web Title :- Amruta Fadnavis | amruta fadnavis criticizes the Maharashtra government, said Has Anil Deshmukh and Parambir Singh gone on a honeymoon?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन पुण्यातील 28 वर्षीय तरूणीवर बलात्कार; कॉलेज कॅम्प्समध्ये पॉर्न व्हिडिओ दाखवून केली जबरदस्ती

Chandrakant Patil | ‘पेट्रोल-डिझेल स्वस्त न होण्यासाठी अजित पवार जबाबदार’ – चंद्रकांत पाटील (व्हिडीओ)

रतन टाटा यांच्या TCS ला 7 व्यावसायिक दिवसात झाला 1.41 लाख कोटी रुपयांचा तोटा, गुंतवणुकदारसुद्धा झाले हैराण