Amruta Fadnavis | पुण्यातील निर्बंधाबाबत अमृता फडणवीस ‘संतापल्या’; म्हणाल्या… (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने राज्यातील काही 25 जिल्ह्यांना निर्बंधांमधून मुक्त करत राज्यातील उर्वरित 11 जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवले आहेत. यातच पुण्यातील पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate Pune) कमी असताना देखील पुण्यातील निर्बंध शिथिल केले नाहीत. पुणे निर्बंधाबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या आज (गुरुवारी) धागा हॅन्डलूम महोत्सवाच्या (Thread Handloom Festival) उद्घाटनासाठी पुण्यात (Pune) आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी सवांद साधला.

 

 

 

माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या, ‘पुण्यात करोनाचा दर 4 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळं इथं सगळं काही सुरळीत होण्याची गरज आहे. असं असताना शहरावर अजूनही बंधनं का आहेत, मला कळत नाही,’ असं आश्चर्य अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. पुढे त्या म्हणाल्या, ‘मुंबईला एक न्याय आणि पुण्याला एक न्याय हे अयोग्य आहे. करोनाचे रुग्ण आता कमी झाले आहेत. नागरिक आता मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत आहेत. असं त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘निर्बंधांमुळं कमी वेळेत अधिक गर्दी होते आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. वेळा वाढविल्यास गर्दी विभागली जाईल. छोट्या व्यावसायिकांचा देखील राज्य शासनाने विचार करावा. इतके दिवस त्यांचा रोजगार गेलाय. म्हणून आता पुणेकरांनीच आणण्यासाठी धरणं आंदोलन केलं पाहिजेत. मुख्यतः म्हणजे फडणवीस यांच्या वक्तव्यावरून त्यांचे हे टीकास्त्र उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर असल्याचे बोललं जात आहे.

हे देखील वाचा

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या DA मध्ये झाली वाढ, जाणून घ्या कोण-कोणत्या राज्यात कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल वाढ

PM Svanidhi Yojana | खुशखबर ! फेरीवाल्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोदी सरकार देऊ शकतं रोख 10000 रूपये

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Amruta Fadnavis on corona restrictions in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update