महाराष्ट्र कुठे ही नेला असो बिहार योग्य ठिकाणीच; अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला म्हटले ‘शवसेना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिहार विधानसभा ( Bihar Assembly) निवडणुकीत एनडीएला यश मिळाले आहे. भाजप ( BJP) आणि जेडीयूने (JDU) या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवले असून, या निवडणुकीत शिवसेनेने ( Shivsena) देखील आपले उमेदवार उतरवले होते. या निवडणुकीत शिवसेनेने 22 जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र, यातील सर्व 22 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही ( Nota) कमी मतदान झालं आहे. सुरुवातीला शिवसेना बिहारमध्ये ५० जागा लढणार होती.परंतु त्यानंतर त्यांनी २२ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. बिहार निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस ( Amruta Fadanvis) यांनी यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

याविषयी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओमध्ये बिहारमधील निवडणुकीतील कामगिरीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादीने युती केल्याचा परिणाम बिहार निवडणुकीवर झाला आहे. काँग्रेस महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर गेल्यानं काँग्रेसने बिहारमध्ये व्होट बँक कमी केली, तर राष्ट्रवादीच्या आधी काही ठिकाणी जागा तरी येत होत्या आता तर तेही झालं नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडिओत म्हटले होते. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी याविषयी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. अमृता यांनी या ट्विटमध्ये शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेचा उल्लेख “शवसेना” असा केला आहे.या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारलं बिहारमध्ये, काय चाललंय तरी काय? महाराष्ट्र कुठे ही नेला असो बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबाबत धन्यवाद” असं ट्विट केलं आहे. त्याचबरोबर बिहारमधील मतदारांचेदेखील त्यांनी आभार मानले आहेत.

दरम्यान, भाजप नेते नीलेश राणे यांनीदेखील शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नीलेश राणे यांनी बिहार निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या यादीचा मजकूर सोशल मीडियावर टाकला आहे. त्याचबरोबर वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन” असं म्हटलं आहे. बिहारमध्ये शिवसेनेची परिस्थिती जशी झाली आहे तशीच परिस्थिती महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यामुळे होईल असंही नीलेश राणे यांनी म्हटलं आहे. “संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहे, तोपर्यंत विरोधकांना भीती नाही. त्यामुळे आता नीलेश राणे यांच्या या टीकेवर शिवसेना काय प्रत्युत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.