भारत पाक सामना थांबवू नका ,भारतीय राष्ट्रगीत गाणाऱ्या पाकिस्तानी फॅनचे भावनिक ट्विट 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या एका शाळेत भारतीय झेंडा फडकवाल्याच्या बातमीमुळे पाकिस्तानात खळबळ माजली होती. एवढेच नाही तर एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने सोशल नेटवर्किंग साईटसवर भारताला पाठिंबा देऊन मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत तिच्यासोबाबत अनेक पाकिस्तानी तरुण तरुणी सहभागी होत आहेत. भारत पाक देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. याचे पडसाद क्रिकेटविश्वावर देखील उमटत आहेत. एवढेच नाही तर २०१९ वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यात भारत-पाक सामना खेळवला जाऊ नये अशी देखील मागणी करण्यात येत आहे. असे असताना इंडो पाक एशिया कप २०१८ मध्ये भारताचे राष्ट्रगीत गाणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट फॅनने भारत -पाक सामना रद्द केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. आदिल ताज असे या फॅन चे नाव आहे.

आदिल ने सोशल नेट्वर्किंग साईटवर एका व्हिडीओ पोस्ट केला आहे. तो क्रिकेटचा जबरा फॅन असून त्याने भारत पाक क्रिकेट मधील मैत्रीपूर्ण संबंधांचे अनेक उदाहरणे दिली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.

“भारताने २०१९ वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानसोबत सामना खेळू नये असे बोलले जात आहे ते कृपा करून असे होऊ देऊ नका. क्रिकेट बॉयकॉट करण्याने काही फायदा होणार नाही. पुलवामा घटनेनंतरही पाकिस्तानी आणि भारतीय खेळाडू अजूनही मैत्रीपूर्ण संबंध जोपासत आहेत. तुम्ही भारतीय क्रिकेटर्सना विचारा त्यांना पाकिस्तानमध्ये किती प्रम मिळाले ? शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तर यांनी कितीतरीवेळा ऑनरेकोर्ड सांगितले आहे की. त्यांना पाकिस्तानापेक्षा भारतात प्रेम मिळाले.

भारत पाक क्रिकेट फॅन्स आणि खेळाडू यांच्यात अजूनही चांगले संबंध आहेत. शाहिद आफ्रिदीच्या घरात आजही सचिंतेंडुलकरने सही केलेली फ्रेम आहे अशा अनेक घटना आहेत ज्यात तुम्हाला कळेल की भारत-पाक खेळाडू यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे भारत- पाक सामना रद्द व्हयला नको. भारत-पाक क्रिकेट सामना ‘मदर ऑफ ऑल मॅच’ आहे त्यामुळे कृपया सामना रद्द होता काम नये. एवढेच नाही तर आयसीसी च्या डायरेक्टर ने देखील सांगितले आहे की या सामान्याकरिता केवळ २५००० जणांची आसनक्षमता असताना आत्ताच ४ लाख लोकांनी भारत-पाक सामान्यांच्या तिकिटांसाठी अर्ज केले आहे. त्यामुळे माझी विनंती आहे हा सामना थांबवू नका”. असे आवाहन पाकिस्तानी फॅन ने केला आहे.