महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती ! CM ठाकरे यांची लवकरच विशेष मुलाखत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त (On the occasion of the anniversary of the government) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकट मुलाखत ( interview) शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये लवकरच प्रसिद्ध होणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) यांची रोखठोक मुलाखत घेतली आहे. ठाकरे सरकारला सत्तेवर येऊन शनिवारी (दि. 28) एक वर्ष पूर्ण होत आहे.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती, राज्यपालांशी संघर्ष, भाजपचे मिशन लोटस, केंद्र सरकारकडून न मिळालेली मदत आदी मुद्यांवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ चाैफेर धडाडणार आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामकाजाचा आढावा या मुलाखतीत कशा प्रकारे मांडणार हेही पाहण्याचे ठरणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद विकोपाला गेला. ‘दिलेल्या शब्दाला जागे राहा’, असे सांगत सेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती.

पण भाजपने तसा शब्दच दिला नव्हता असे सांगत नकार दिला. त्यामुळे सेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. या महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण होणार आहे. दि. 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली होती. त्यानिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रकट मुलाखत पाहण्यास मिळणार आहे.

You might also like