संतापजनक ! ९ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, ७६ वर्षीय वृध्दाला बेड्या

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ९ वर्षीय मुलीसोबत ७६ वर्षीय वृध्दाने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी या वृध्दाला बेड्या ठोकल्या आहेत.

तुलसीदास वक्कर (वय ७६) या वृध्दाला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

गेल्या मंगळवारी पिडीत मुलगी इमारतीखाली खेळत होती. त्यावेळी तिला परीक्षेत मिळालेल्या गुणांबाबत वृध्दाने विचारणा केली. त्यानंतर तिला पेढे दे असे म्हणत तिच्याशी अश्लील चाळे करण्यास त्याने सुरुवात केली. तिने विरोध केला आणि इमारतीच्या पाठीमागे गेली. त्यावेळी तो तिच्या पाठीमागे गेला.

आणि तिच्याशी पुन्हा अश्लील चाळे करू लागला. त्यानंतर याप्रकराची माहिती तिने आई वडीलांना दिली. आई वडीलांनी त्याच्याकडे जाब विचारला. तेव्हा काही केले नसल्याचा आव आणला.त्यानंतर त्यांनी आवारातील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा त्याने अश्लील चाळे केल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली. तेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल अटक केली.

Loading...
You might also like