Andheri East By-Election | राज ठाकरे-पवारांच्या भूमिकेला रामदास आठवलेंचा विरोध, अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढली पाहिजे, म्हणाले – ‘राज ठाकरेंच्या पत्राला…’

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभर लक्षवेधक ठरलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीने (Andheri East By-Election) आता वेगळे वळण घेतले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भाजपाला (BJP) पत्र देऊन मुरजी पटेल (Murji Patel) यांची उमेदवारी मागे घेऊन शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्यासाठी बिनविरोध निवडणूक करण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांच्यापाठोपाठ शरद पवार (Sharad Pawar) यांनीही बिनविरोध निवडणुकीचे (Andheri East By-Election) आवाहन सर्व पक्षांना केले आहे. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ठाकरे-पवार यांच्याविरोधात भूमिका मांडली आहे.

 

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक (Andheri East By-Election) बिनविरोध होण्याबाबत राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले, राज ठाकरे यांच्या पत्राला काही अर्थ नाही. राज ठाकरे यांचे मत असले तरी निवडणूक लढवली पाहिजे.

 

रामदास आठवले म्हणाले, लोकशाहीमध्ये निवडणूक लढवणे हा आमचा अधिकार आहे. तिथे निवडणूक लढू नये, असे राज ठाकरेंचे मत असले तरी निवडणूक लढली पाहिजे, असे आमचे मत आहे. भाजपने तिथे उमेदवार उभा केला आहे आणि आरपीआयने (RPI) त्याला पाठिंबा दिला आहे.

आठवले पुढे म्हणाले, शिवसेनेच्या (Shivsena) ऋतुजा लटके या उमेदवार आहेत.
आरपीआयने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मुरजी पटेल यांच्यासोबत दलित समाज मोठ्या संख्येने राहणार आहे,
त्यामुळे अंधेरी पूर्वचा गड आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या फरकाने आमचा उमेदवार निवडून येईल.

 

Web Title :- Andheri East By-Election | andheri east bypoll raj thackeray letter to devendra fadnavis ramdas athawale reaction