बलात्कार करणाऱ्यांना आता 21 दिवसात होणार शिक्षा, आंध्रप्रदेश सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांमध्ये देशात बलात्कराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून आले होते. आता आंध्र प्रदेश सरकारने विधानसभेत नव्या ‘दिशा’ विधेयकाला मंजुरी दिली आहे. वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी सरकारने घेतलेला हा निर्णय महत्वपूर्ण निर्णय समजला जात आहे.

काय आहे नेमके दिशा विधेयक
या विधेयकानुसार कायद्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. या विधेयकानुसार बलात्काराचा तपास 7 दिवसांमध्ये पूर्ण केला जाईल आणि 14 दिवसात याबाबतचा खटला संपवला जाणार आहे आणि आरोपी दोषी आढळल्यास त्यांना 21 दिवसात फाशी दिली जाणार आहे. सर्व आमदारांनी एकमताने या विधेयकासाठी मंजुरी दिली. त्यामुळे आता बलात्काऱ्यांना 21 दिवसात शिक्षा होणार आहे.

या आधी देखील रेड्डी सरकारने केले होते प्रयत्न
महिलांवरील अत्याचारांवर जगनमोहन सरकार गंभीर आहेत. महिलांवरील बलात्काराच्या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद नव्या कायद्यात करण्यात येत आहे. भारतीय दंड संहिता यातील कलम 354 मध्ये सुधारणा करुन त्यात कलम 354 ई लागू करण्यात येईल. यानुसार महिला, अल्पवयीन मुली यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी असे मत याआधी देखील रेड्डी सरकारने व्यक्त केले होते तसेच यासाठी विधेयक करणार असल्याचे देखील सांगितले होते.

हैदराबाद प्रकरणानंतर देशातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे हे बाब लक्षात घेऊन आंध्र प्रदेश सरकारने त्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/