तिरुपती : टँकरची वाट पहात बसले, ऑक्सीजनच्या संपल्याने 11 रूग्णांचा तडफडून मृत्यू

तिरुपती : वृत्त संस्था – आंध्र प्रदेशच्या तिरुपतीमध्ये सोमवारी रात्री ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे 11 रुग्णांचा जीव गेला. कलेक्टरने या मृत्यूंना दुजारो दिला आहे. कलेक्टर एम. हरी नारायण यांनी सांगितले की, ऑक्सीजन संपल्याने 11 रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या हॉस्पिटलकडे एक टँकर आहे आणि आणखी एक टँकर सकाळपर्यंत पोहचणार आहे. प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री वाय. एस. जगमोहन रेड्डी यांनी दिले.

घटना तिरुपतीच्या रुइया हॉस्पीटलमध्ये घडली आहे, ज्यास सरकारी कोविड हॉस्पीटल बनवण्यात आले आहेत. मात्र, येथे इतर रूग्णांवर सुद्धा उपचार सुरू होते. कलेक्टरने 11 मृत्यू झाल्याचे सांगितले, पण हॉस्पिटल अधीक्षक डॉ. भारती यांनी सांगितले की, 9 कोरोना रूग्ण आणि 3 नॉन-कोविड रूग्णांचा मृत्यू झाला आहे. या हिशोबाने 12 मृत्यू होतात. 5 रूग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

घटनेनंतर चित्तूरचे जिल्हा कलेक्टर हरी नारायण, जॉईंट कलेक्टर आणि म्युनिसिपल कमिश्नरने हॉस्पिटलचा दौरा केला. तर, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री अल्ला नानीने रुइया हॉस्पिटल अधीक्षक डॉ. भारती यांना फोन करून स्थितीची माहिती घेतली. तर, सीएम जगन मोहन रेड्डी यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी घटनेचा रिपोर्ट सुद्धा मागवला आहे.

एक ऑक्सीजन टँकर येणार होता, परंतु तो पोहचू शकला नाही, ज्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजनची कमतरता झाली आणि रूग्णांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये एकुण 135 रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. अजूनही 5 रूग्णांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

या दुर्घटनेचे काही व्हिडिओ आता सोशल मीडियावर वायरल होत आहेत, ज्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की, ऑक्सीजनमुळे रूग्णांची प्रकृती कशाप्रकारे बिघडली होती. रूग्णांच्या शेजारी उभे नातेवाईक हवालदिल झाल्याचे दिसत आहे. आता या प्रकरणावरून राजकारण सुरू झाले असून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.