Video : खरा सिंघम ! तब्बल 2 KM गाडीच्या ‘बोनेट’वर झोपून आरोपीला पकडले

पोलिसनामा ऑनलाईन – आंध्र प्रदेशातील एसआय गोपीनाथ रेड्डी सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दारुची तस्करी करणार्‍या आरोपीला पकडण्यासाठी गोपीनाथ यांनी चक्क 2 किमी गाडीच्या बोनेटवर झोपला आहे. त्यानंतर त्यांनी आरोपीला बेड्या घातल्या आहेत.

अवैध दारुचा साठा घेऊन जाणारी एक गाडी आंध्रातील कडप्पा तालुक्याच्या दिशेने जात आहे. अशी माहिती गोपीनाथला मिळाली होती. त्यानुसार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. मात्र पोलिसांना पाहताच या आरोपीने गाडी बॅरिगेट्स तोडून पळवली. आरोपी पळून जात असल्याचे कळताच गोपीनाथ रेड्डी यांनी फिल्मी स्टाइलने गाडीच्या बोनेटवर उडी मारली. त्यानंतर तब्बल दोन किमी आरोपीचा पाठलाग केला. हा सगळा प्रकार रस्त्यावरच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला. त्यानंतर आरोपीने गाडी थांबवल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. स्वत:चा जीव धोक्यात टाकून आरोपीला पकडल्याबद्दल गोपीनाथचे सर्वत्र कौतुक होत आहे.