Android युजर्सला मोठी Warning ! चुकूनही Download करू नका ‘हे’ 19 Apps, जाणून घ्या यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    गुगल प्ले स्टोअरवरील (Google Play Store) आता अशा 19 अँड्रॉईड अप्सची (Android Apps) माहिती समोर आली आहे जे युजर्सला नुकसान पोहोचवण्यासाठी आले आहेत. त्यामुळे आता युजर्सनं त्या अ‍ॅपची यादी पहावी आणि ते चुकूनही डाऊनलोड करून नयेत.

अँटीव्हायरस कंपनी Avast च्या सिक्योरिटी टीमकडून हा इशारा देण्यात आला आहे. यात असं सांगितलं आहे की, गुगल प्ले स्टोअरवरील अनेक अशा अ‍ॅप्सची माहिती उघड झाली आहे जे युजर्सच्या फोनमध्ये खूप सारे अ‍ॅडवेअर इंस्टॉल करतात. हे अ‍ॅप्स अँड्रॉईड युजर्सना लक्ष्य करतात. आता अशाच एकूण 22 अ‍ॅडवेअर पॅक्ड अ‍ॅप्सची माहिती उघड झाली आहे. यातील 3 अ‍ॅप्स गुगलनं हटलवे आहेत. परंतु अवास्टच्या माहितीनुसार, अजूनही 19 अ‍ॅप्सची तपासणी सुरू आहे. सध्या हे अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरच उपलब्ध आहेत.

फोनमध्ये दिसू लागतात जाहिराती

यातील अनेक अ‍ॅप्स हे फन गेम्स आहेत. यात कार रेसिंग, हेलिकॉप्टर ते क्रिमिनलला शुट करणं आणि व्हर्च्युअल कपडे उतरवणं असे ऑप्शन्स देणाऱ्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. समोर आलेल हे अ‍ॅप्स प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत यांना 80 लाखांहून अधिक डाऊनलोड्सही मिळाले आहेत. एकदा हे अ‍ॅप्स डाऊनलोड झाल्यानंतर Hidden Apps Trojan ओरिजनल अ‍ॅप बंद झाल्यावर खूप साऱ्या जाहिराती दिसू लागतात. या जाहिराती नोटीफिकेशन्स ते फुल स्क्रीनपर्यंत दिसू लागतात. यातील अनेक अ‍ॅप्स डेटा चोरी करून थर्ड पार्टीला पाठवतात.

हे Apps चुकूनही करू नका Download

1) Shoot Them
2) Crush Car
3) Rolling Scroll
4) Helicopter Attack
5) Assassin Legend
6) 2020 NEW
7) Helicopter Shoot
8) Rugby Pass
9) Flying Skateboard
10) Iron it
11) Shooting Run
12) Plant Monster
13) Find Hidden
14) Find 5 Fidderences
15) Rotate Shape
16) Jump Jump
17) Find The Fidderences
18) Puzzle Games
19) Sway Man
20) Desert Against
21) Money Destroyer
22) Cream Trip