अंजनविहिर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने ३० ते ३५ जनावरांना चावा घेतला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहीरे येथे रात्री साडेदहा च्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने ३० ते ३५ जनावरांचा चावा घेतला.यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. सुदैवाने शेतावर असणारे शेतकरी सुरक्षित राहिले.मात्र पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त कसा होईल? आणि कोण करेल? या प्रश्नाने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सदर घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य मनोहर देवरे यांनी तालुका पशु वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी सुरेश शिवदे यांना माहिती दिली.पंचायत समिती सदस्य मनोहर देवरे,,पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.एच.एम. खलाणे ,डॉक्टर अजून अशोक गुजराती, डॉ. मंडाले यांनी अंजनविहीरे येथील घटना स्थळी भेट दिली आणि सदर घटनेचे प्रत्यक्ष माहिती घेतली.

यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कुत्र्याने चावा घेतलेल्या संपूर्ण ३० ते ३५ जनावरांना ॲंटी रेबिजच्या लसी दिल्या आहेत .यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळाला असला तरी उर्वरित संपूर्ण डोस पूर्ण करून घेण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर येऊन पडली. चौथा शनिवार असल्यावरही घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन जनावरांवर प्राथमिक औषधोपचार केले .यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

लक्ष्मण ठेलारी नमन ठेलारी,भाऊराव तुकाराम पाटील ,भाऊराव तुकाराम पाटील ,बाजीराव उत्तम पाटील, लक्ष्मण विश्राम भिल, विनोद गुलाब मासाळ, भीमराव अमृत मासाळ ,नितीन देविदास शिरसाट, सदाशिव दलपत पाटील, पंकज साहेबराव पाटील ,श्याम हिम्मतराव पाटील ,साहेबराव नाटु पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे जनावरांचा यामध्ये समावेश आहे. यात मुखतः गाई ,म्हशी आणि कालवड आहेत. दुभत्या जनावरांना पिसाळ कुत्र्याने चावा घेतल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. ऐन पावसाळ्यात पावसाने अद्याप हुलकावणी दिली असून आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांवर हे दुहेरी संकट ओढवले आहे.

आरोग्य विषयक वृत्त- 

‘ध्यान’धारणा केल्याने ‘हे’ आजार होतात बरे

 ‘लैंगिक’ क्षमता जागृत करण्यासाठी योगासनांची ‘विशेष’ भूमिका

नियमीत योगा केल्याने ‘हे’ फायदे, जाणून घ्या

दीर्घायुष्यासाठी ‘हे’ आसन करा